परभणी : येलदरी धरणातून सोडणार पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 12:59 AM2018-12-31T00:59:57+5:302018-12-31T01:00:29+5:30

पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय झाला असून ३१ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत या धरणावर बांधलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातील गेटमधून दररोज ५ दलघमी पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जाणार आहे.

Parbhani: Water released from Yeladri dam | परभणी : येलदरी धरणातून सोडणार पाणी

परभणी : येलदरी धरणातून सोडणार पाणी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
येलदरी (परभणी): पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी धरणातूनपाणी सोडण्याचा निर्णय झाला असून ३१ डिसेंबर रोजी दुपारपर्यंत या धरणावर बांधलेल्या जलविद्युत निर्मिती केंद्रातील गेटमधून दररोज ५ दलघमी पाणी पूर्णा नदीपात्रात सोडले जाणार आहे.
यावर्षी येलदरी धरणातील संपूर्ण पाणी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यातील २२३ गावे, महानगरपालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत आदींच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या पाणीपुरवठा योजनांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. त्यामुळे हे पाणी बिगर सिंचन पाणीपुरवठा योजनांसाठी सोडण्यात येणार आहे. मागील तीन महिन्यांपासून येलदरी धरणाखालील तिन्ही कोल्हापुरी बंधारे कोरडे पडल्यामुळे या भागातील २० ते २५ गावांमध्ये पाण्याची तीव्रता निर्माण झाली होती. त्यामुळे येथील शेतकºयांनी येलदरी धरणाचे पाणी नदीपात्रात सोडण्याची मागणी केली होती.
या मागणीचा विचार करुन ३१ डिसेंबर रोजी धरणातील पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. ८ ते ९ दिवस नदीपात्रात पाणी सोडण्यात येईल. त्यामुळे २० ते २५ गावांमधील शेतकºयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निकाली निघणार आहे.
२२.५ मेगावॅट वीज निर्मिती
येलदरी धरणावर जलविद्युत निर्मिती प्रकल्प कार्यरत आहे. धरणातून सोडले जाणारे पाणी विद्युत वीज निर्मिती केंद्राच्या दरवाजांमधून नदीपात्रात झेपावणार असल्याने हे विद्युत केंद्रही सुरु होणार आहे. यातून २२.५ मेगावॅट विजेची निर्मिती होणार आहे.

Web Title: Parbhani: Water released from Yeladri dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.