परभणी : दिवसाकाठी सव्वा लाखाची उलाढाल;टंचाईमुळे पाणी विक्रेत्यांची चांदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 11:33 PM2019-03-23T23:33:16+5:302019-03-23T23:34:05+5:30

शहरात टंचाई वाढल्याने आता बहुतांश नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी विक्रेत्यांनीही कंबर कसली असून, दिवसाकाठी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल पाण्यातून होऊ लागली आहे. मनपाच्या नियोजनाअभावी शहरवासियांवर टंचाईचे संकट ओढवल्याची ओरड होत आहे.

Parbhani: Twenty-three-odd turnover of the day; Silver of water dealers due to scarcity | परभणी : दिवसाकाठी सव्वा लाखाची उलाढाल;टंचाईमुळे पाणी विक्रेत्यांची चांदी

परभणी : दिवसाकाठी सव्वा लाखाची उलाढाल;टंचाईमुळे पाणी विक्रेत्यांची चांदी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरात टंचाई वाढल्याने आता बहुतांश नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहेत. ही परिस्थिती लक्षात घेऊन पाणी विक्रेत्यांनीही कंबर कसली असून, दिवसाकाठी सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल पाण्यातून होऊ लागली आहे. मनपाच्या नियोजनाअभावी शहरवासियांवर टंचाईचे संकट ओढवल्याची ओरड होत आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारी योजना ३० वर्षांपूर्वीची असून, संपूर्ण शहराला मुबलक पाणीपुरवठा करण्याची या योजनेची क्षमता नाही. त्यामुळे उन्हाळा असो की पावसाळ्यात परभणीकरांना किमान १० दिवसांनाच पाणी मिळते. सद्यस्थितीत पाण्याच्या आवर्तनाचा कालावधी १२ दिवसांवर जाऊन ठेपला आहे. त्यातही अनेक प्रभागात जलवाहिनी पोहोचली नसल्याने येथील नागरिकांना हातपंप किंवा विकतच्या पाण्यावरच अवलंबून रहावे लागत आहे. रहाटी बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना शहरात मात्र नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.
निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईचा फायदा उचलत मागील काही दिवसांपासून खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. एका आॅटोरिक्षात १ हजार आणि २ हजार लिटरच्या पाण्याच्या टाक्या ठेवून हे विक्रेते शहरात पाण्याचा व्यवसाय करीत आहे. अशा विक्रेत्यांची संख्या आता शंभरावर पोहोचली आहे. शहराबाहेर असणाऱ्या खाजगी विहीर किंवा बोअरवरुन पाणी आणून ते शहरवासियांना दिले जात आहे. एक हजार लिटर पाणी २५० रुपयांना आणि २ हजार लिटर ५०० रुपयांना विक्री केले जाते. एक विक्रेता दिवसभरात किमान पाच फेºया करतो. सुमारे १२५० रुपयांचा त्याचा दिवसाचा व्यवसाय होतो. सरासरी १०० विक्रेत्यांची पाण्यातून पाण्यातून सुमारे १ लाख २५ हजार रुपयांची उलाढाल होत आहे.
मनपाच्या नळयोजनेतून मिळणारे पाणी १२ दिवसांपर्यंत साठवणे शक्य नसल्याने अनेकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. शिवाय जलवाहिनी नसलेल्या भागात हातपंपांची पाणी पातळी खालावल्याने या भागातूनही विकतच्या पाण्याला मागणी वाढत आहे. मागील आठवड्यात रहाटी येथील विद्युत पंपाचे स्टार्टर खराब झाल्याने काही भागात १४ दिवसानंतर पाणी सोडण्यात आले. या सर्व परिस्थितीमुळे शहरात पाण्याची टंचाई वाढली असून, पाण्यातून आर्थिक उलाढाल वाढत चालली आहे. मनपाने याकडे लक्ष देऊन टंचाईग्रस्त भागास टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत आहे.
महापालिकेचे चार टँकर सुरू
४शहरात निर्माण झालेली पाण्याची टंचाई लक्षात घेऊन ४ टँकरच्या साह्याने नागरिकांना पाणीपुरवठा केला जात असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले. ज्या भागातून पाण्याची मागणी वाढली आहे, त्या भागास टँकरने पाणीपुरवठा करण्यास प्राधान्य दिले जात आहे. सध्या जलवाहिनी नसलेल्या भागात चार टँकर सुरू करण्यात आल्याची माहिती मनपाने दिली. शहरवासियांना नियमित पाणी मिळत नसल्याने जलवाहिनी असलेल्या भागातही टंचाई जाणवत आहे. त्यामुळे केवळ जलवाहिनी असलेल्या भागातील परिस्थिती पाहून टँकरची संख्या वाढवावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Parbhani: Twenty-three-odd turnover of the day; Silver of water dealers due to scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.