परभणी : दुसऱ्या दिवशीही चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 12:16 AM2019-06-14T00:16:34+5:302019-06-14T00:18:00+5:30

सलग दुसºया दिवशीही चोरट्यांनी तालुक्यात धुमाकूळ घातला असून, तालुक्यातील सावळी येथे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १३ जून रोजी रात्री १ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली़ चोरीच्या घटना वाढल्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़

Parbhani: thunder of the thieves in the next day | परभणी : दुसऱ्या दिवशीही चोरट्यांचा धुमाकूळ

परभणी : दुसऱ्या दिवशीही चोरट्यांचा धुमाकूळ

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): सलग दुसºया दिवशीही चोरट्यांनी तालुक्यात धुमाकूळ घातला असून, तालुक्यातील सावळी येथे ३ लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना १३ जून रोजी रात्री १ ते ६ वाजेच्या दरम्यान घडली़ चोरीच्या घटना वाढल्यामुळे शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे़
तालुक्यातील सावळी येथील रहिवासी रंगनाथ किशनराव रणेर हे रात्री १ वाजता कुटूंबासह घराच्या छतावर झोपण्यासाठी गेले होते़ या संधीचा फायदा घेत घराच्या दरवाज्याची कडी तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला़ १० तोळे सोन्याचे दागिने, पँट खिशातील रोख २६ हजार रुपये आणि ४ हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकूण ३ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १३ जून रोजी सकाळी ६ वाजता उघडकीस आली़ चोरी झाल्याचे लक्षात येताच रणेर कुटूंबियांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली़ त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला़ पोलीस उपनिरीक्षक शिवाशंकर मन्नाळे हे तपास करीत आहेत़ दरम्यान, १२ जून रोजी चोरट्यांनी शहरातील ९ दुकानांना टार्गेट करून चोरी केली होती.
या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच चोरट्यांनी आपला मोर्चा ग्रामीण भागाकडे वळवून ३ लाखांची धाडसी चोरी करून पोलिसांसमोर आव्हान उभे केले आहे़ सतत होणाºया चोऱ्यांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे़
पोलिसांसमोर चोरट्यांचे आव्हान
४मानवत शहरामध्ये ११ जून रोजी चोरट्यांनी ९ दुकाने फोडली होती़ चोरट्यांच्या हाती यातून काहीही लागले नसले तरी शहरातील नागरिक व व्यापारी भयभीत झाले आहेत़ त्यामुळे मानवत पोलीस तातडीने पावले उचलत चोरट्यांचा शोध घेतील, अशी अपेक्षा शहरवासियांना होती़ मात्र १२ जून रोजीच्या मध्यरात्री मानवत तालुक्यातील सावळी येथे चोरट्यांनी धुमाकूळ घालून जवळपास ३ लाखांचा ऐवज लंपास केला आहे़ त्यामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा शहराऐवजी आता ग्रामीण भागाकडे वळविल्याचे १२ रोजीच्या घटनेवरून समोर येत आहे़ त्यामुळे मानवत पोलिसांसमोर चोरट्यांनी आव्हान निर्माण केले आहे़

Web Title: Parbhani: thunder of the thieves in the next day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.