परभणी : राईनपाडा घटनेची तृतीयपंथीयांना धास्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:31 AM2018-07-15T00:31:08+5:302018-07-15T00:33:48+5:30

धुळे जिल्ह्यातील राईनपाडा घटनेचे खोलवर परिणाम भटकंती करून उदरनिर्वाह भागविणाऱ्या समाजावर झाले असून, जालना जिल्ह्यातून शहरात भटकंती करण्यासाठी येणाºया तृतीयपंथीयांनी शनिवारच्या बाजारात चक्क नगरसेवकाने दिलेले ओळखपत्र सोबत ठेवून भटकंती केल्याचे दिसून आले़ ओळखपत्रासह आलेल्या या तृतीयपंथीयांच्या चेहºयावर राईनपाडा घटनेची धास्ती शनिवारी प्रथमच पहावयास मिळाली़

Parbhani: The third generation of Ranipada incident is scared | परभणी : राईनपाडा घटनेची तृतीयपंथीयांना धास्ती

परभणी : राईनपाडा घटनेची तृतीयपंथीयांना धास्ती

Next

मोहन बोराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
सेलू (परभणी) : धुळे जिल्ह्यातील राईनपाडा घटनेचे खोलवर परिणाम भटकंती करून उदरनिर्वाह भागविणाऱ्या समाजावर झाले असून, जालना जिल्ह्यातून शहरात भटकंती करण्यासाठी येणाºया तृतीयपंथीयांनी शनिवारच्या बाजारात चक्क नगरसेवकाने दिलेले ओळखपत्र सोबत ठेवून भटकंती केल्याचे दिसून आले़ ओळखपत्रासह आलेल्या या तृतीयपंथीयांच्या चेहºयावर राईनपाडा घटनेची धास्ती शनिवारी प्रथमच पहावयास मिळाली़
मुले पळविणारी टोळी कार्यरत असल्याची अफवा राज्यभरात पसरल्यानंतर निष्पाप लोकांना मारहाण करण्याचे प्रकार परभणी जिल्ह्यासह राज्यभरात घडू लागले़ अनोळखी माणूस शहरात दाखल झाल्यानंतर त्याच्याकडे संशयाने बघितले जात आणि या संशयातूनच हजारो जमावांचा बळी पडण्याची वेळ भटकंती करणाºया समाजावर आली होती़ यातूनच धुळे जिल्ह्यातील राईनपाडा येथे गोसावी समाजातील पाच जणांची जमावाने ठेचून हत्या केली होती़ या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता़ भटकंती करणाºया सर्वच समाजावर घटनेचे खोलवर परिणाम झाले असून, त्याचा अनुभव शनिवारी सेलू शहरामध्ये आला़
शनिवारी सेलू शहराचा आठवडी बाजार भरतो़ या बाजारपेठेत तालुक्यातील गावांमधून ग्रामस्थ मोठ्या संख्येने खरेदीसाठी येतात़ दिवसभर होणारी गर्दी लक्षात घेऊन जालना शहरातून तृतीयपंथी दर शनिवारी सेलू शहरात दाखल होतात़ बाजारपेठेत फिरुन हे तृतीय पंथी पैसे जमा करतात़ मागील अनेक वर्षांपासूनच त्यांचा हा नित्यनियम आहे़ तालुक्यातील इतर गावांमध्येही ते फिरतात़ १४ जुलै रोजी दुपारी हे तृतीयपंथी सेलू शहरात दाखल झाले़ बाजारपेठेत येत असताना एक गोष्ट प्रकर्षाने डोळ्यात भरत होती ती म्हणजे प्रत्येक तृतीय पंथीयाने गळ्यात ओळखपत्र अडविले होते़ या ओळखपत्रावर त्यांचे नाव, पत्ता असा मजकूर लिहिला होता़ प्रथमच ओळखपत्र घेऊन भटकंती करणारे तृतीयपंथी पाहून प्रत्येकाला आश्चर्य वाटले़ बाजारकरूंसाठी हा अश्चर्याचा विषय असला तरी या तृतीयपंथीयांमध्ये राईनपाडा घटनेची धास्ती असल्याचे त्यांच्या चेहºयावरून जाणवत होते़ या घटनेची पुनरावृत्ती होवू नये, अनोळखी माणसाला आपली ओळख पटावी, या उद्देशानेच तृतीय पंथीयांनी हे पाऊल उचलले असावे़ या तृतीयपंथीयांपैकी एकाशी संवाद साधला तेव्हा त्यानेही या गोष्टीला पुष्टी दिली़ आम्ही गुन्हेगार नसून पोटासाठी भटकंती करीत आहोत; परंतु, अनाहूतपणे आमच्यावरही राईनपाडासारखी वेळ येऊ नये़ त्यामुळेच ओळखपत्राची सुविधा केली असल्याचे त्यांनी सांगितले़
नगरसेवकांचे ओळखपत्र
संशयावरून तृतीयपंथीयांना मारहाण होऊ नये़ अशी काही वेळ आलीच तर त्यांना स्वत:चा पत्ता किंवा ओळख पटविण्यासाठी काही तरी जवळ असावे, या उद्देशाने जालना येथील नगरसेवकांनी पुढाकार घेऊन स्वत:च्या सही शिक्क्यानिशी त्यांना ओळखपत्र पुरविले आणि हेच ओळखपत्र भटकंती करताना तृतीयपंथीयांसाठी आधार ठरू लागले आहे़

 

Web Title: Parbhani: The third generation of Ranipada incident is scared

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.