परभणी : बागायती पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2019 12:18 AM2019-05-01T00:18:00+5:302019-05-01T00:18:22+5:30

जायकवाडीच्या कॅनॉल कार्यक्षेत्रात असलेल्या पाथरगव्हाण बु. परिसरातील बागायती पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. ३० एकरवरील पपईची बाग आणि ३५ हजार केळींचा फड शेवटची घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.

Parbhani: started cultivating horticultural crops | परभणी : बागायती पिके करपू लागली

परभणी : बागायती पिके करपू लागली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
पाथरी (परभणी) : जायकवाडीच्या कॅनॉल कार्यक्षेत्रात असलेल्या पाथरगव्हाण बु. परिसरातील बागायती पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. ३० एकरवरील पपईची बाग आणि ३५ हजार केळींचा फड शेवटची घटका मोजत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांना लाखो रुपयांच्या नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे.
पाथरी तालुक्यात यावषी कमी पाऊस पडल्याने राज्य शासनाने तालुक्यात गंभीर दुष्काळ जाहीर केला आहे. आॅगस्ट महिन्यापासून पाऊस गायब झाला. त्यातच उन्हाची प्रचंड तीव्रता वाढत असताना जमिनीतील पाण्याची पातळी झपाट्याने खालावत आहे. त्यामुळे जमिनीत ५०० फूट बोअरवेल खोदूनही पाणी लागत नाही. उपलब्ध पाण्याचा स्त्रोतही दिवसेंदिवस आटत चालला आहे. दुष्काळाची दाहकता अधिक तीव्र होत आहे. पाथरी तालुक्यातील जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्या लगत असलेल्या भागातही पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. पाथरगव्हाण बु. परिसरात जायकवाडीच्या पाण्यावर एवढे दिवस शेतातील पिके तग धरून होती. सध्या जायकवाडीलाही पाणी पाळी सोडण्यात आली नसल्याने बागायती पिके धोक्यात आली आहेत. या परिसरात ३० एकरवर मल्चिंग करून शेतकऱ्यांनी पपई लागवड केली आहे. साधारणत: एकरी १२०० झाड असे एकूण ३६ हजार पपईची लागवड केली आहे; परंतु, सध्या पाणी स्त्रोत आटल्याने पपईची झाडे करपून जाऊ लागली आहेत.
त्याच बरोबर या गावात ३५ हजार केळीची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला पाणी चांगले असल्याने केळीचे पीक बहरले होते; परंतु, सध्याच्या स्थितीत वाढता उन्हाचा कडाका त्याच बरोबर आटलेल्या जलस्त्रोतांमुळे केळीचे घड पाण्याअभावी मोडून पडू लागले आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा खर्च करून वाढविलेली बागायती शेती पाण्याअभावी उद्ध्वस्त होत आहे.
शेतकरी संकटात : पाणी देण्याची मागणी
४पाथरी तालुक्यातील बागायती पिके पाण्याअभावी करपून जात आहेत. ही पिके जगविण्यासाठी असेलेले जलस्त्रोत पूर्णत: आटून गेले आहेत. त्यामुळे या पिकांना जगविण्यासाठी पाणीच उपलब्ध नाही. त्यामुळे बागायती शेती धोक्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व राज्य शासनाने तातडीने पावले उचलत जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून तात्काळ एक पाणी पाळी द्यावी, अशी मागणी होत आहे.
४एकीकडे दुष्काळी परिस्थितीमुळे बागायती शेती करपून जात असताना दुसरीकडे मात्र राज्य शासन दुष्काळी उपाययोजना राबविण्यासाठी कोणतेही पावले उचलत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडले आहेत. दुष्काळी अनुदान, सन्मान निधीचे अनुदान अद्यापही बहुतांश शेतकºयांना मिळाले नाही. त्यामुळे राज्य शासनाने दुष्काळी परिस्थिती निवारण्यासाठी पावले उचलावीत, अशी मागणी आहे.

सुरुवातीला जायकवाडीच्या कालव्यात सोडण्यात आलेल्या पाण्याने मागील चार महिन्यात बागायती पिकांनी तग धरला होता. आता पाणीच नसल्याने बागायती पिके करपून जात आहेत. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून बागायती शेती करणारा शेतकरी उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे बागायती पिके वाचविण्यासाठी जायकवाडी च्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे.
-एकनाथ घांडगे,
शेतकरी, पाथरगव्हाण

Web Title: Parbhani: started cultivating horticultural crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.