Parbhani: ST corporation loss of Rs 75 lakh | परभणी :एसटी महामंडळाचे ७५ लाखांचे नुकसान
परभणी :एसटी महामंडळाचे ७५ लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार हे दोन दिवस महामंडळाची सेवा ठप्प झाली़ त्यामुळे बुधवारी प्रवास करणाºया ९० हजार प्रवाशांना फटका बसत परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया सात आगाराला ७५ लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले़
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव प्रकरणाचे सलग तिसºया दिवशीही परभणी जिल्ह्यात पडसाद उमटले आहेत़ सोमवारी दुपारनंतर परभणी शहरातील बाजारपेठ बंद झाल्यानंतर मंगळवारी संपूर्ण जिल्हाभर आंदोलने झाली़ यामध्ये मंगळवारी परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयांतर्गत येणाºया परभणी जिल्ह्यातील चार आगारातील १४ व हिंगोली जिल्ह्यातील तीन आगारातील ९ बसेसवर दगडफेक झाली़ या पार्श्वभूमीवर परभणी विभागीय नियंत्रक कार्यालयाच्या वतीने मंगळवारी सकाळी ११ वाजेपासून बसेस बंद केल्या होत्या. बुधवारी तर महामंडळाने एकही बस बाहेर सोडली नाही़ परभणी जिल्ह्यातील पाथरी, गंगाखेड, परभणी, जिंतूर व हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी व वसमत या सात आगारांतून दररोज बसमधून जवळपास ९० हजार प्रवासी प्रवास करतात़ यातून महामंडळाला मोठे उत्पन्नही मिळते़
मात्र भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवार व बुधवार हे दोन दिवस महामंडळाची सेवा ठप्प झाल्याने महामंडळाचे ७५ लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती विभागीय नियंत्रक जालिंदर सिरसाठ यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
बंद दरम्यान सहा लाखांचा बसला फटका
पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, गंगाखेड व पाथरी या आगारातील १४ बसवर दगडफेक झाली़ हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, वसमत व हिंगोली या तीन आगारातील ९ बस फोडण्यात आल्या़ त्यामुळे महामंडळाचे ६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे़ त्यामुळे मंगळवारच्या घटनेनंतर बुधवारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी म्हणून एकही बस आगारातून सोडण्यात आली नाही़


Web Title: Parbhani: ST corporation loss of Rs 75 lakh
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.