परभणी : घरकुलासाठी वाळू उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 12:35 AM2019-07-01T00:35:58+5:302019-07-01T00:36:16+5:30

पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकूल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्यामुळे ठप्प झाले होते़ मात्र घरकुलांसाठी राखीव असलेल्या तालुक्यातील थार येथील वाळू धक्क्यावरून कमी दरात वाळू उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़

Parbhani: Sandwiches available for the house | परभणी : घरकुलासाठी वाळू उपलब्ध

परभणी : घरकुलासाठी वाळू उपलब्ध

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मानवत (परभणी): पालिकेच्या वतीने शहरात राबविल्या जाणाऱ्या रमाई घरकूल योजनेचे काम वाळू उपलब्ध नसल्यामुळे ठप्प झाले होते़ मात्र घरकुलांसाठी राखीव असलेल्या तालुक्यातील थार येथील वाळू धक्क्यावरून कमी दरात वाळू उपलब्ध झाल्याने लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़
रमाई घरकूल योजनेंतर्गत शहरात आंबेडकरनगर, बुद्धनगर यासह विविध ठिकाणी रमाई घरकूल योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामे सुरू आहेत़ बांधकाम अर्ध्यापर्यंत आल्यानंतर वाळुची आवश्यकता भासू लागली़ मात्र तीन आठवड्यापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाने वाळू उपस्याला स्थगिती दिल्यानंतर तालुक्यातील वांगी, कुंभारी येथील वाळू धक्क्यावरील वाळू उपसा बंद करण्यात आला होता़ त्यामुळे पुन्हा वाळुची टंचाई निर्माण झाली होती़ अवैधरित्या वाळूसाठा करून ठेवणाºया वाळूची अव्वाच्या सव्वा दराने वाळू विक्री सुरू केल्याने गोरगरीब लाभार्थ्याना या दराने वाळू घेणे परवडत नव्हते़ घरकूल बांधकामासाठी तालुक्यातील थार येथील वाळू धक्का राखीव केला आहे. या ठिकाणावरून शहरातील व ग्रामीण भागातील रमाई घरकूल लाभार्थ्यांना अल्प दरात वाळू उपलब्ध झाल्याने बांधकामाचा प्रश्न सुटला असून, लाभार्थ्यांना दिलासा मिळाला आहे़
मानवत शहरातील रमाई घरकूल योजनेतील लाभार्थी मागील दोन-तीन महिन्यांपासून वाळूच्या प्रतिक्षेत होते़ कधी तालुका प्रशासन तर कधी जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईमुळे लाभार्थ्यांना घरकूल बांधकामासाठी वाळू मिळणे दुरापास्त झाले होत़े़ हक्काच्या निवाºयाचे स्वप्न पाहणाºया घरकूल लाभार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात होता़ परंतु, थार येथील वाळू धक्क्यावरून अल्प दरात वाळू मिळणार असल्याने समाधान व्यक्त होत आहे़
मजुरांच्या हाताला मिळाले काम
४तालुक्यातील अनेक मजूर बांधकाम व्यवसायाशी निगडीत आहेत़ यातून मिळणाºया मोबदलत्यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह चालवितात़ मात्र मागील अनेक दिवसांपासून वाळू उपलब्ध होत नसल्याने बांधकामे ठप्प पडली होती़
४परिणामी मजूर बेरोजगार झाल्याने त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली होती़ राखीव वाळू घाटांवरून वाळू उपलब्ध झाल्याने बांधकाम व्यावसायिकांसह गोरगरीब मजुरांच्या हाताला काम मिळाल्याचे चित्र शहरात दिसून येत आहे़
१०२ कामे सुरू
४रमाई घरकूल योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात मानवत शहरात ६८ घरकुले मंजुर झाली होती़ यापैकी ३४ घरकुलांचे काम सुरू आहे तर दुसºया टप्प्यात १०५ घरकुले मंजूर असून, ६८ घरकुलांची कामे सुरू असल्याची माहिती नगरपालिकेने दिली़ सुरुवातीला ३ ब्रास वाळू २० हजार रुपये या भावाने गोरगरीब लाभार्थ्यांना घ्यावी लागली़
४यामुळे आर्थिक फटका बसला़ तालुक्यातील वांगी, कुंभारी येथील वाळू धक्के सुटल्यावरही १२ हजार रुपयांना ३ ब्रास वाळू खरेदी करावी लागली़ हा दरही परवडणारा नसल्याचे समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने घरकुलांसाठी लाभार्थ्यांना कमी दरात वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली होती़ या मागणीची दखल घेत थार येथील वाळू धक्क्यावरून अल्प दरात वाळू उपलब्ध करून देण्यात आली असून, लाभार्थ्यांचे रखडलेले बांधकाम सुरू झाले आहे़

Web Title: Parbhani: Sandwiches available for the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.