परभणी : तीन महिन्यांत २५ लाखांचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 12:49 AM2018-11-22T00:49:20+5:302018-11-22T00:49:59+5:30

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून तीन महिन्यांमध्ये वाहतूक पोलिसांनी ९ हजार ९५६ जणांवर कारवाई करीत तब्बल २४ लाख ७६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़

Parbhani: Recovery of penalty of 25 lakhs in three months | परभणी : तीन महिन्यांत २५ लाखांचा दंड वसूल

परभणी : तीन महिन्यांत २५ लाखांचा दंड वसूल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांकडून तीन महिन्यांमध्ये वाहतूक पोलिसांनी ९ हजार ९५६ जणांवर कारवाई करीत तब्बल २४ लाख ७६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला आहे़
परभणी शहरात वाहनचालकांकडून नियमांचे पालन केले जात नाही़ त्यामुळे शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे यांनी २ आॅगस्ट रोजी या विभागाचा पदभार घेतल्यानंतर त्यांनी बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई सुरू केली़ यामध्ये उलट्या दिशेने वाहने चालविणे, वाहनांवर नंबर प्लेट नसणे, दादा, मामा, सर, बॉस, काका आदी फॅन्सी नंबर प्लेट लावणे, ट्रिपल सीट, अतिवेगाने वाहन चालविणे, वाहन चालविण्याचा परवाना सोबत नसणे, अस्पष्ट नंबर प्लेट, बुलेटच्या सायलनसरमध्ये बदल करून कर्णकर्कश आवाज करणे, वाहतुकीस अडथळा होईल, अशा ठिकाणी वाहने उभी करणे आदी कारणावरून ९ हजार ९५६ दुचाकी, तीन चाकी व चार चाकी वाहनांवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली़ त्यामध्ये २४ लाख ७६ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करून तो शासनाकडे जमा करण्यात आला़ तसेच याच कालावधीत दारू पिवून वाहन चालविणाºया ७९ वाहनधारकांवर कारवाई करीत त्यांच्याकडून ४४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला़ शहर वाहतूक शाखेच्या वतीने सपोनि गजेंद्र सरोदे यांनी केलेल्या या कारवाईचा शहरात बºयापैकी परिणाम दिसून येऊ लागला आहे़
दरम्यान, रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने सर्वोच्च न्यायालयाने व रस्ता सुरक्षा समितीने दिलेले आदेश विचारात घेऊन वाहतुकीचे नियम भंग करणाºया वाहन चालकांचा वाहन चालविण्याचा परवाना किमान तीन महिने कालावधीसाठी निलंबित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत़
त्यानुसार या संदर्भातील मोहीम राबविण्यात येणार असल्याचे सपोनि सरोदे यांनी सांगितले़ त्यामुळे बेशिस्त वाहनधारकांना पुन्हा एकदा वेगळया कारवाईला सामोरे जावे लागणार आहे़

Web Title: Parbhani: Recovery of penalty of 25 lakhs in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.