परभणी : तीन वर्षांत केवळ २४ तक्रारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:00 AM2018-03-08T00:00:16+5:302018-03-08T00:00:26+5:30

महिलांचे प्रश्न तातडीने निकाली लागून त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने सुरू केलेल्या महिला लोकशाही दिनात तक्रारी दाखल करण्यासाठी महिलांची उदासिनता असल्याचे दिसून आले आहे़ तीन वर्षांमध्ये केवळ २४ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यात फेब्रुवारी महिन्यातील २१ तक्रारींचा समावेश आहे़ त्यामुळे शासनाच्या या योजनेला जिल्ह्यात अजूनही प्रतिसादच मिळत नसल्याचे दिसत आहे़

Parbhani: Only 24 complaints in three years | परभणी : तीन वर्षांत केवळ २४ तक्रारी

परभणी : तीन वर्षांत केवळ २४ तक्रारी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : महिलांचे प्रश्न तातडीने निकाली लागून त्यांना न्याय मिळावा, या उद्देशाने सुरू केलेल्या महिला लोकशाही दिनात तक्रारी दाखल करण्यासाठी महिलांची उदासिनता असल्याचे दिसून आले आहे़ तीन वर्षांमध्ये केवळ २४ तक्रारी दाखल झाल्या असून, त्यात फेब्रुवारी महिन्यातील २१ तक्रारींचा समावेश आहे़ त्यामुळे शासनाच्या या योजनेला जिल्ह्यात अजूनही प्रतिसादच मिळत नसल्याचे दिसत आहे़
जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने निकाली निघावेत, या उद्देशाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने लोकशाही दिन ही संकल्पना राबविली जाते़ वारंवार तक्रारी केल्यानंतरही न्याय मिळत नसेल तर लोकशाही दिनात तक्रार नोंदविल्यास या तक्रारीचा वेळेत निपटारा केला जातो़ लोकशाही दिनातील दाखल तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे बंधनच घालण्यात आले आहे़ त्यामुळे या लोकशाही दिनात प्रत्येक महिन्यात तक्रारींचा मोठा ओघ असल्याचे पहावयास मिळते़ लोकशाही दिनाला नागरिकांकडून मिळालेला प्रतिसाद पाहून राज्य शासनाने २०१४ मध्ये केवळ महिलांसाठी विशेष लोकशाही दिन घेण्याचा निर्णय घेतला़ समाजातील महिलांचे प्रश्न तातडीने निकाली निघावेत, त्यांना न्यायासाठी प्रशासनाच्या दारोदार भटकंती करण्याची वेळ येऊ नये आणि महिलांची होणारी कुचंबना थांबावी, या उदात्त हेतुने महिला लोकशाही दिन साजरा केला जात आहे़ मात्र या दिनाची केवळ औपचारिकताच होत असल्याचे आजपर्यंतच्या अनुभवावरून दिसून आले आहे़ कारण महिलांसाठी एक चांगला उपक्रम राबविला असला तरी त्यास प्रतिसादच मिळत नसल्याचे समोर आले आहे़
परभणी जिल्ह्यात महिलांसाठी लोकशाही दिन सुरू होवून आता तीन वर्षांचा कालावधी लोटला आहे़ प्रत्येक महिन्यामध्ये हा लोकशाही दिन घेतला जातो़ परंतु, तक्रारीच दाखल होत नसल्याचे दिसत आहे़ २०१४ मध्ये महिला लोकशाही दिनाची सुरुवात झाली तेव्हा डिसेंबर महिन्यात केवळ एक तक्रार दाखल झाली होती़ त्यानंतर थेट २०१७ मध्ये डिसेंबर महिन्यात १, यावर्षीच्या जानेवारी महिन्यात १ तक्रार प्रशासनाकडे आली होती़ फेब्रुवारी महिन्यात मात्र या महिला लोकशाही दिनाला पहिल्यांदाच सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे पहावयास मिळाले़ या महिन्यात २१ तक्रारी दाखल झाल्या़ त्यापैकी २० तक्रारींचा निपटारा करण्यात आला असून, एका प्रकरणात तक्रारकर्ती महिला उपस्थित झाली नसल्याने हे प्रकरण प्रलंबित आहे़ तीन महिन्यांच्या काळात केवळ मागील महिन्यातच सर्वाधिक तक्रारी प्राप्त झाल्या़ त्यामुळे महिलांसाठी शासन आणि प्रशासनाने हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असतानाही त्याचा लाभ मात्र महिला घेत नसल्याचे दिसत आहे़ समाजात अनेक प्रश्न आहेत़ महिलांच्या संदर्भातील या प्रश्नांवर कुठे न्याय मिळत नसेल तर महिला लोकशाही दिनात तक्रार केली जाऊ शकते़ मात्र महिला लोकशाही दिनासंदर्भात प्रशासनाकडून उचित जनजागृती झाली नाही़ परिणामी ही योजना राबवूनही त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने योजनेच्या हेतुलाच तिलांजली मिळत आहे़ क्तीक स्वरुपाच्या तक्रारींचा निपटारा
शासनाने प्रत्येक महिन्यात महिला लोकशाही दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे़ त्यानुसार जिल्हास्तरावर प्रत्येक महिन्याच्या तिसºया सोमवारी आणि तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन केले जातो़ या लोकशाही दिनात महिलांच्या तक्रारी दाखल करण्यासाठी काही नियमावली घालून दिल्या आहेत़ त्यामध्ये महिलांनी केवळ वैयक्तीक स्वरुपाचीच तक्रार करावी, ही तक्रार सामूहिक स्वरुपाची नसावी़ आस्थापना किंवा सेवा विषयक तक्रारी तसेच न्याय प्रविष्ठ तक्रारी लोकशाही दिनात स्वीकारल्या जात नाहीत़ केवळ सर्वसामान्य महिलांच्याच तक्रारीसाठी हा लोकशाही दिन सुरू करण्यात आला आहे़

तर सुटले असते महिलांचे प्रश्न
जिल्ह्यात महिलांचे वैयक्तीक स्वरुपाचे अनेक प्रश्न दररोज उद्भवतात़ परंतु, महिलांमध्येच जागृती नसल्याने या प्रश्नांना वाचा फुटत नाहीत़ अनेक वेळा स्थानिक पोलीस ठाणे किंवा संबंधित विभागाकडे तक्रारीही दाखल होतात़ परंतु, या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी बराच वेळ खर्ची होतो़
यावर तोडगा काढण्यासाठी महिला लोकशाही दिनाची संकल्पना सुरू करण्यात आली़ त्यामुळे जिल्ह्यातील महिला या लोकशाही दिनात तक्रार दाखल करून न्याय मिळवून घेऊ शकतात़ अनेक प्रकरणांमध्ये महिलांना अधिकाºयांकडून योग्य तो सल्लाही मिळू शकतो़ यातून न्याय मिळण्यासाठीचा मार्गही सापडू शकतो़ परंतु, अन्यायग्रस्त महिला अधिकाºयांपर्यंत पोहचत नसल्याने प्रश्न जैसे थै राहत आहेत़ तेव्हा यासाठी अधिकाºयांनीच महिला लोकशाही दिनाची जनजागृती करणे गरजेचे आहे़

Web Title: Parbhani: Only 24 complaints in three years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.