परभणी : विस्तारित एमआयडीसीसाठी बुधवारी मुंबईत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2018 11:32 PM2018-03-06T23:32:15+5:302018-03-06T23:32:26+5:30

शहरातील वसमत रोडवरील एमआयडीसीमधील प्लॉट संपले असल्याने नवीन विस्तारित एमआयडीसी गंगाखेड रोडवरील बोरवंड शिवारात उभारण्यासाठी ७ मार्च रोजी दुपारी २़३० वाजता मुंबई येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक बोलावली आहे़

Parbhani: Mumbai meeting for extended MIDC on Wednesday | परभणी : विस्तारित एमआयडीसीसाठी बुधवारी मुंबईत बैठक

परभणी : विस्तारित एमआयडीसीसाठी बुधवारी मुंबईत बैठक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील वसमत रोडवरील एमआयडीसीमधील प्लॉट संपले असल्याने नवीन विस्तारित एमआयडीसी गंगाखेड रोडवरील बोरवंड शिवारात उभारण्यासाठी ७ मार्च रोजी दुपारी २़३० वाजता मुंबई येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी अधिकारी व लोकप्रतिनिधी यांची बैठक बोलावली आहे़
परभणी येथील वसमत रोडवरील एमआयडीसीमध्ये जवळपास १७० प्लॉटचे उद्योजकांना वाटप अनेक वर्षांपूर्वी करण्यात आले़ सरकारी आकडेवारीनुसार एमआयडीसीत ७० उद्योग बºयापैकी सद्यस्थितीत सुरू आहेत़ तर काही उद्योग बंद पडले आहेत़
एमआयडीसीत सद्यस्थितीत नवीन उद्योजकांना प्लॉट देण्याकरीता जागाच उपलब्ध नसल्याने विस्तारित एमआयडीसी उभारण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती़ त्या अनुषंगाने ७ मार्च रोजी मुंबई येथे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, अधिकारी व काही उद्योजकांची बैठक बोलावली आहे़ यावेळी आ़ डॉ़ राहुल पाटील यांची उपस्थिती राहणार आहे़
या बैठकीत गंगाखेड रोडवरील बोरवंड शिवारात विस्तारित एमआयडीसी उभारण्याच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे़ त्यामुळे या चर्चेत नवीन एमआयडीसीसह परभणीत एखादा मोठा उद्योग आणण्याच्या अनुषंगाने सकारात्मक पाऊल उचलले जावे, अशी अपेक्षा परभणीकरांकडून व्यक्त केली जात आहे़
परभणी शहरातएमआयडीसीच्या अधिकाºयांची लपवाछपवीील एमआयडीसी विकासापासून दूर राहण्यात अधिकाºयांची निष्क्रीयताही तेवढीच कारणीभूत ठरली आहे़ नवीन उद्योग आणण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही़ तसेच आहे त्या उद्योगांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात नाहीत़ शिवाय या संदर्भातील माहितीही सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून दिली जात नसल्याचा प्रकार यानिमित्ताने समोर आला आहे़
एमआयडीसीमध्ये एकूण किती प्लॉटचे वितरण झाले? त्यातील किती उद्योग सुरू आहेत? किती बंद आहेत? याबाबतची माहिती घेण्याच्या अनुषंगाने सदरील प्रतिनिधीने एमआयडीसीच्या विविध अधिकाºयांशी संपर्क साधला असता ठोस माहिती न देता केवळ टोलवाटोलवी करण्याची भूमिका या अधिकाºयांनी घेतल्याचे दिसून आले़
एमआयडीसीचे नांदेड विभागाचे विभागीय अधिकारी कोटेवाड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती मेलवर देतो असे सांगण्याची औपचारिकता पूर्ण केली़ या विभागाचे एक अधिकारी मिलिंद वानखेडे यांनी फोनला प्रतिसादच दिला नाही़
येथील लिपिक निशांत यलमाटे यांनी बदली झाल्याचे सांगितले़ तर एमआयडीसीचे बांधकाम विभागाचे उपअभियंता शिंदे यांनी बाहेरगावी असल्याचे सांगितले़ त्यामुळे एमआयडीसीच्या माहितीच्या अनुषंगाने हे अधिकारी किती जागरुक आहेत हे यानिमित्ताने समोर आले आहे़

Web Title: Parbhani: Mumbai meeting for extended MIDC on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.