परभणी : चित्रपटांच्या माध्यमातून भाषेविना प्रगट होतात भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2018 12:27 AM2018-02-01T00:27:09+5:302018-02-01T00:27:13+5:30

करिअर म्हणून चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकताना सुरुवातीला तंत्रशुद्ध व शास्त्रीय पद्धतीने लघुपट बनवावा, असे माझे विचार होते़ मात्र या क्षेत्राचा अभ्यास केला तेव्हा भावनेला भाषेची गरज नसते, असे माझे मत बनले आणि त्यातूनच भावनिक बंधाचा अविष्कार असलेला ‘चाफा’ हा लघुपट तयार झाला, असे दिग्दर्शिका मानसी देवधर यांनी सांगितले़

Parbhani: Movies are revealed without language through language | परभणी : चित्रपटांच्या माध्यमातून भाषेविना प्रगट होतात भावना

परभणी : चित्रपटांच्या माध्यमातून भाषेविना प्रगट होतात भावना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : करिअर म्हणून चित्रपट क्षेत्रात पाऊल टाकताना सुरुवातीला तंत्रशुद्ध व शास्त्रीय पद्धतीने लघुपट बनवावा, असे माझे विचार होते़ मात्र या क्षेत्राचा अभ्यास केला तेव्हा भावनेला भाषेची गरज नसते, असे माझे मत बनले आणि त्यातूनच भावनिक बंधाचा अविष्कार असलेला ‘चाफा’ हा लघुपट तयार झाला, असे दिग्दर्शिका मानसी देवधर यांनी सांगितले़
परभणी फिल्म क्लबच्या वतीने आयोजित कार्यक्रमासाठी दिग्दर्शिका देवधर परभणीत आल्या होत्या़ यावेळी त्यांच्याशी संवाद साधला़ तेव्हा लघुपटांच्या निर्मितीबरोबरच या क्षेत्राविषयी त्यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या़ बालपणापासूनच नाटकांची आवड असल्याने अभिनय आणि नाट्यक्षेत्रात मी काम करत गेले़ उषा परब, निखील कुलकर्णी यांच्याकडून अभिनयाचे धडे घेतले़ पुढे वाचन, निरीक्षण, भाषण, फोटोग्राफी आदी छंद जोपासले़ अनेक स्पर्धेच्या माध्यमातून कलेशी जवळीक निर्माण झाली आणि मी या क्षेत्रात स्थिरावत गेले़ मी मुलगी आहे म्हणून आई-वडिलांनी कधीही बंधने घातली नाहीत, असेही त्यांनी यावेळी सांगितले़ चित्रपट दिग्दर्शनात महिला फारच कमी आहेत़ तुम्ही हे क्षेत्र का निवडले? या प्रश्नावर त्या म्हणाल्या, लहानपणापासूनच चित्रपट क्षेत्राची आवड होती़ त्यातही चित्रपट बनविण्याविषयी स्वत:च्या संकल्पना होत्या आणि या संकल्पना चित्रपटाच्या माध्यमातून रसिकांसमोर आणण्याचे ध्येय मी ठेवले़ त्यामुळे या क्षेत्रात उतरले असल्याचे त्यांनी सांगितले़ चित्रपट क्षेत्रामध्ये महिला आणि पुरुष असा भेद नसतो हे त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले़ कलावंत हा कलावंत असतो़ त्यामुळे या क्षेत्रात पदार्पण करताना दिग्दर्शिका बनण्यापेक्षा दिग्दर्शक बननेच मला अधिक आवडेल, असेही त्यांनी यावेळी नमूद केले़
चित्रभाषेच्या माध्यमातून अनेक संकल्पना आपण पडद्यावर मांडू शकतो़ चित्रभाषेला शब्दांचे बंधन नसते़ चाफा हा लघुपटही याच धाटणीतला आहे़ हा माझा प्रयत्न अनेकांना भावला़ विशेष म्हणजे लघुपटाचे कौतुक होत असतानाच अनेक पुरस्कारही मिळाले़ मात्र मी एवढ्यावर थांबणार नाही़ या क्षेत्रातील माझे शिक्षण अजून सुरूच आहे़ यापुढेही दर्जेदार कलाकृती निर्माण करण्यासाठी मी प्रयत्नरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले़
मनोरंजनापेक्षा समस्या मांडणे महत्त्वाचे
चित्रपट या क्षेत्राकडे मनोरंजनाचे साधन म्हणून सर्वसामान्यपणे पाहिले जाते़ आज अनेक कलाकार या क्षेत्रात दाखल होत आहेत़ त्यामध्ये महिला कलाकारांचाही समावेश असतो़ चित्रपटांची निर्मिती होताना अनेक पात्र महिला कलाकार साकारतात़ परंतु, या सर्व प्रक्रियेमध्ये मनोरंजनाला गौण स्थान देत महिलांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची गरज आहे़ चित्रपटांमधून मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनही अधिक सक्षमपणे होवू शकते, असे देवधर यांनी सांगितले़

Web Title: Parbhani: Movies are revealed without language through language

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.