परभणीत इंटरनेट सेवा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2018 11:46 PM2018-10-11T23:46:54+5:302018-10-11T23:47:32+5:30

परभणी शहरातील बीएसएनएलची इंटरनेटसेवा गुरुवारी तब्बल चार तास ठप्प पडल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ मागील काही दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले असून, ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे़

Parbhani Internet service disrupted | परभणीत इंटरनेट सेवा विस्कळीत

परभणीत इंटरनेट सेवा विस्कळीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : परभणी शहरातील बीएसएनएलचीइंटरनेटसेवा गुरुवारी तब्बल चार तास ठप्प पडल्याने ग्राहकांना गैरसोयींचा सामना करावा लागला़ मागील काही दिवसांपासून इंटरनेट सेवा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले असून, ग्राहकांना मन:स्ताप सहन करावा लागत आहे़
परभणी जिल्ह्यात बीएसएनएलची इंटरनेट सेवा वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अधिक आहे़ ब्रॉडबँड इंटरनेट तसेच मोबाईलवरून इंटरनेट वापरले जाते़ खाजगी कंपन्यांनी इंटरनेट सेवा अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचविली असताना भारतीय दूर संचार निगमने मात्र आपली सेवा ग्राहकाभिमूख करण्याऐवजी या सेवेत अडथळे वाढविले आहेत़ परभणी शहरासह जिल्हाभरात ब्रॉडबँडच्या माध्यमातून इंटरनेट वापरणाºया ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे़ मोबाईल ग्राहकांची संख्याही अधिक आहे़ मात्र इतर खाजगी कंपन्यांच्या तुलनेत भारतीय दूर संचार निगमची सेवा कुचकामी ठरत आहे़ वारंवार सेवा विस्कळीत होणे, इंटरनेटची गती कमी होणे असे प्रकार घडत असून, ग्राहक केवळ सेवा मिळत नसल्याने खाजगी कंपन्यांचे इंरटनेट वापरण्यावर भर देत आहेत़
येथील भारतीय दूर संचार निगमच्या कार्यालयात ग्राहकांच्या तक्रारींची वेळेत दखल घेतली जात नाही़ त्यामुळे ग्राहकांना त्रासाला सामोरे जावे लागते़ परभणी जिल्ह्यामध्ये भारतीय दूर संचार निगमच्या माध्यमातूनच ब्रॉडबँडची सेवा पुरविली जाते़ ठिक ठिकाणी केबल अंथरून ब्रॉडबँड इंटरनेट पुरविले जात आहे़ असे असताना ही सेवा ग्राहकाभिमूख होत नसल्याने ग्राहकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे़ दरम्यान, गुरुवारी सकाळी १० वाजेपासून परभणी शहरातील अनेक भागांमध्ये भारतीय दूर संचार निगमचे इंटरनेट बंद पडले़ त्यामुळे ग्राहकांची कामे खोळंबली़ ही इंटरनेट सेवा कधी पूर्ववत होते, याची प्रतीक्षा करावी लागली़
अखेर चार तासानंतर इंटरनेट सेवा पूर्ववत झाली़ भारतीय दूर संचार निगमच्या परभणी कार्यालयाकडे या संदर्भात विचारणा केली असता, नांदेड येथूनच इंटरनेट सेवा बंद असल्याचे सांगण्यात आले़
व्यावसायिकांना आर्थिक फटका
सर्वसाधारणपणे घरगुती वापरासाठी खाजगी कंपन्यांचे इंटरनेट मोबाईलच्या माध्यमातून वापरले जात असले तरी व्यावसायासाठी मात्र भारतीय दूर संचार निगमच्या इंटरनेट सेवेलाच प्राधान्य दिले जाते़ त्यामुळे बीएसएनएलची सेवा वापरणाºया व्यावसायिक ग्राहकांची संख्या अधिक आहे़ ही सेवा ठप्प झाली तर ग्राहकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते़ त्यामुळे ग्राहकांत संताप व्यक्त होत आहे़

Web Title: Parbhani Internet service disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.