परभणी : ग्रा.पं. सदस्यांचे मानधन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 12:04 AM2019-02-24T00:04:20+5:302019-02-24T00:04:37+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क चारठाणा ( परभणी ) : जिंतूर तालुक्यातील १०९३ ग्रा.पं. सदस्य व १३५ सरपंचांचे मागील दोन वर्षांपासून ...

Parbhani: G.P. The honor of the members has been stopped | परभणी : ग्रा.पं. सदस्यांचे मानधन रखडले

परभणी : ग्रा.पं. सदस्यांचे मानधन रखडले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
चारठाणा (परभणी) : जिंतूर तालुक्यातील १०९३ ग्रा.पं. सदस्य व १३५ सरपंचांचे मागील दोन वर्षांपासून मानधन रखडले आहे. पंचायत विभागाला शासनाकडून मानधन प्राप्त झाले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी दोन वर्षांपासून या ग्रा.पं. सदस्य व सरपंचांना मासिक भत्त्याची प्रतीक्षा लागली आहेत.
जिंतूर तालुक्यात एकुण १३६ ग्रामपंचायती असून १३५ सरपंच सध्या कार्यरत आहेत. तर एका सरपंचाचे पद रिक्त असल्याने तेथील पदभार उपसरपंचाकडे आहे. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये एकूण १०९३ सदस्य आहेत. या सदस्यांना पूर्वी केवळ २५ रुपये मासिक सभेचा भत्ता दिला जात होता; परंतु, यानंतर यामध्ये वाढ करण्यात येऊन २०० रुपये मानधन करण्यात आल्याची घोषणा शासनाने केली होती; परंतु, या घोषणेची अजूनही अंमलबजावणी झाली नाही. सरपंचाला मासिक ५०० रुपयांवरुन दरमहा १००० रुपये मानधन करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. मात्र हंी घोषणा देखील हवेत विरली आहे. असे असले तरी जानेवारी २०१७ पासून आता पर्यंतचे सरपंच व सदस्यांचे मानधन प्रलंबित आहे. दोन वर्षाचा कालावधी लोटला तरी अद्यापपर्यंत मानधन मिळाले नाही. जिंतूर तालुक्यातील ५० टक्के ग्रा.पं.च्या निवडणुका पहिल्या टप्प्यात मे-जून २०१५ मध्ये झाल्या होत्या. दुसऱ्या टप्प्यात आॅक्टोबर-नोव्हेंबर २०१५ मध्ये उर्वरित काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या होत्या. विशेष म्हणजे पहिल्या टप्प्यात झालेल्या ग्रा.पं. सदस्यांचे आता काही महिनेच शिल्लक राहिले असताना देखील ते मासिक मानधनापासून वंचित आहेत. याबाबत पंचायत समितीच्या पंचायत विभागाशी संपर्क साधला असता मागच्या दोन वर्षापासून आमच्याकडे शासनाकडून मानधनाचा निधी प्राप्त झाला नसल्याने आम्ही संबधित ग्रामपंचातीना मानधन रक्कमेचे धनादेश पाठविले नसल्याचे सांगण्यात आले. एकंदरीत या प्रकरणी प्रशासकीय पातळीवर कुठलेच नियोजन नसल्याने मागच्या दोन वर्षापासून संबधित सरपंच व ग्रा.पं. सदस्यांचे मानधन रखडले असल्याने सरपंच व ग्रा.पं.सदस्यांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Web Title: Parbhani: G.P. The honor of the members has been stopped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.