परभणी-जिंतूर रस्ता : आंदोलनाची रुपरेषा जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2019 12:06 AM2019-05-10T00:06:47+5:302019-05-10T00:07:36+5:30

जिंतूर-परभणी रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ सुरू करण्यात यावे व पावसाळ्यात होणाऱ्या वाहतुकीच्या त्रासातून प्रवाशांची सुटका करावी, या मागणीसाठी जिंतूर-परभणी रस्ता जनआंदोलन समितीच्या वतीने आंदोलनाची रुपरेषा जाहीर करण्यात आली.

Parbhani-Geetur road: The outline of the agitation | परभणी-जिंतूर रस्ता : आंदोलनाची रुपरेषा जाहीर

परभणी-जिंतूर रस्ता : आंदोलनाची रुपरेषा जाहीर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी): जिंतूर-परभणी रस्त्याचे रखडलेले काम तत्काळ सुरू करण्यात यावे व पावसाळ्यात होणाऱ्या वाहतुकीच्या त्रासातून प्रवाशांची सुटका करावी, या मागणीसाठी जिंतूर-परभणी रस्ता जनआंदोलन समितीच्या वतीने आंदोलनाची रुपरेषा जाहीर करण्यात आली.
जनआंदोलन समितीच्या वतीने ८ मे रोजी जिल्हाधिकारी निवेदन देण्यात आले. रस्त्याचे काम तत्काळ सुरू करून पावसाळ्यामध्ये वाहनधारकांची होणारी अडचण दूर करून उपाययोजना करावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. त्यानंतर जिंतूर येथे समितीची बैठक पार पडली. २० मे रोजी १० हजार नागरिकांच्या सह्यांचे निवेदन विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांना देण्यात येणार आहे. यानंतरही या रस्त्याचे काम सुरू झाले नाही तर १ जून रोजी जिंतूर तालुका बंद, रास्तारोको व जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने सकारात्मक पावले उचलून रस्त्याचे काम सुरू करावे, अशी मागणी संघर्ष समितीने केली आहे. अ‍ॅड.मनोज सारडा, रमेश दरगड, सचिन देवकर, आशिष सावजी, रत्नदीप कळमकर, विजय चोरडिया, डॉ. दुर्गादास कान्हडकर, अ‍ॅड. विनोद राठोड, मुख्याध्यापक गोविंद, अ‍ॅड. गोपाळ रोकडे, विनोद पाचपिल्ले, प्रदीप कोकडवार, अ‍ॅड.दीपक साळेगावकर, गणेश कुºहे, प्रभाकर लिखे, बी.पी. सांगळे, शेख वाजीद, नितीन बंगाळे, शहेजाद खान पठाण, प्रा. विजय पोहने, सुभाष मस्के, मुकुंद पत्की यांची उपस्थिती होती.

Web Title: Parbhani-Geetur road: The outline of the agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.