परभणी : हुल्लडबाजी करणाऱ्यांची कोठडीत रवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 12:43 AM2018-09-29T00:43:26+5:302018-09-29T00:44:02+5:30

वाढदिवस असल्याच्या कारणावरुन शहरात बुलेट व मोटारसायकलवर फिरुन हुल्लडबाजी करीत गोंधळ करणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालय परिसरात करण्यात आली.

Parbhani: Deportes to the racketeers | परभणी : हुल्लडबाजी करणाऱ्यांची कोठडीत रवानगी

परभणी : हुल्लडबाजी करणाऱ्यांची कोठडीत रवानगी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : वाढदिवस असल्याच्या कारणावरुन शहरात बुलेट व मोटारसायकलवर फिरुन हुल्लडबाजी करीत गोंधळ करणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास पोलीस मुख्यालय परिसरात करण्यात आली.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, शहरातील नानलपेठ परिसर व इतर ठिकाणचे तरुण बुलेट व मोटारसायकलवर फिरुन हुल्लडबाजी करीत होते. बुलेटच्या सायलन्सरमध्ये बदल करुन मोठ्याने आवाज काढला जात होता. तसेच वेगवेगळ्या घोषणा देऊन शहरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती नानलपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी हुल्लडबाजी करणाºयांना ताब्यात घेण्याचे आदेश पोलीस कर्मचाºयांना दिले. त्यानुसार नानलपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांनी या हुल्लडबाजांचा पाठलाग केला. पोलीस मुख्यालयाच्या परिसरात एक बुलेट व एक मोटारसायकल या दोन वाहनांवरील अबरार खान शब्बीर खान पठाण (३५), मो.शोएब अ.बशीर (२५), मो.मुखीद मो.आलीम (२३) या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात आणले. येथे त्यांना याबाबतचा जाब विचारला असता अबरार खान याचा वाढदिवस असल्याने शहरात फिरत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलिसांनी या तिघांनाही चांगला चोपही दिला. तसेच त्यांना अटकही करण्यात आली. ही कारवाई पोनि.गाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. सुनील पुंगळे, फौजदार देशमुख, पोकॉ.लटपटे, उमर, कसबे, मुजमुले, थोरवे, पवार, गुंगाणे, रेवले यांच्या पथकाने केली.
जप्त केलेल्या बुलेटची आरटीओ कार्यालयाकडून तपासणी केली जाणार असून त्यानंतर वेगळा गुन्हा दाखल करण्यात येईल, असे पोनि.गाडेकर यांनी सांगितले.

Web Title: Parbhani: Deportes to the racketeers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.