परभणी : अवैध दारूचा साठा पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:38 PM2019-02-25T23:38:09+5:302019-02-25T23:38:29+5:30

शहरातील भिकुलाल पेट्रोलपंपासमोर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २५ फेब्रुवारी रोजी छापा टाकून अवैध दारुचा साठा जप्त केला आहे.

Parbhani: caught an illegal liquor stock | परभणी : अवैध दारूचा साठा पकडला

परभणी : अवैध दारूचा साठा पकडला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शहरातील भिकुलाल पेट्रोलपंपासमोर स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने २५ फेब्रुवारी रोजी छापा टाकून अवैध दारुचा साठा जप्त केला आहे.
भिकुलाल पेट्रोलपंपासमोर आत्माराम धोंडीबा पवार, उमाजी मनोहर शिंदे (दोघे रा.खडाळा ता. पूर्णा) हे चोरुन दारु विक्री करीत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. तसेच नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीत कैलास लक्ष्मणराव वाव्हळ व भगवान लेढे या दोघांनाही दारु विक्री करताना पोलिसांनी पकडले. या चारही आरोपींकडून दारुसाठ्यासह ८८ हजार १६१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
मटका जुगार अड्ड्यावर छापा
४मटका जुगार या अवैध धंद्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई केली आहे. मानवत तालुक्यातील कोल्हा पाटी येथे एका हॉटेलमध्ये रामप्रसाद भोजीराम भिसे व लक्ष्मण नारायण भिसे हे मटका घेत असताना मिळून आले. तसेच गंगाखेड तालुक्यातील राणीसावरगाव येथील बसस्थानकावर शेख इब्राहीम यास मटका घेत असताना पोलिसांनी पकडले आहे. दोन्ही कारवायांमध्ये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून ४० हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल व एक मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश कापुरे, सुरेश डोंगरे, हनुमंत जक्केवाड, मधुकर चट्टे, बाळासाहेब तुपसुंदरे, निलेश भूजबळ, हरि खुपसे, अरुण कांबळे, सय्यद मोबीन, भगवान भुसारे, दिलावर पठाण, जमीर फारोखी, कोनगुलवार, यशवंत वाघमारे यांनी या कारवाया केल्या.

Web Title: Parbhani: caught an illegal liquor stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.