परभणी: ४३३ कुटुंबियांना मिळणार शासकीय मदतीचा हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 12:53 AM2017-12-18T00:53:46+5:302017-12-18T00:53:52+5:30

जिल्ह्यातील ४३३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाणार असून २२ डिसेंबरपासून जिल्हा प्रशासन विशेष योजनेअंतर्गत हे काम करणार आहे.

Parbhani: 433 families will get government help | परभणी: ४३३ कुटुंबियांना मिळणार शासकीय मदतीचा हात

परभणी: ४३३ कुटुंबियांना मिळणार शासकीय मदतीचा हात

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: जिल्ह्यातील ४३३ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाणार असून २२ डिसेंबरपासून जिल्हा प्रशासन विशेष योजनेअंतर्गत हे काम करणार आहे.
विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार अधिकारी व कर्मचाºयांनी मागील महिन्यात परभणी जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना भेटी दिल्या होत्या. या कुटुंबियांची संपूर्ण माहिती प्रशासनाने नव्याने उपलब्ध करुन घेतली. त्यात आत्महत्याग्रस्त कुटुंबांची सध्याची परिस्थिती, उपलब्ध असलेली शेती, सद्य परिस्थितीत कुटुंबातील शेतकºयांना रोजगाराभिमूख कौशल्य प्रशिक्षणाची आवश्यकता आहे का? आरोग्याच्या संदर्भाने प्रशासन काही मदत करु शकते का? शेतीचा विकास करण्यासाठी सिंचनाच्या सोयी उपलब्ध करुन दिल्या जाऊ शकतात का? तसेच बँकांचे कर्ज, कर्ज माफीचा लाभ मिळाला का? कर्ज देण्यास बँकांनी नकार दिला आहे का? या मुद्यांवर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची माहिती प्रशासनाने एकत्र केली.
या माहितीचे वर्गीकरण करण्यात आले असून या वर्गीकरणानुसार आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना त्यांच्या आवश्यकतेनुसार तातडीने शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार आहे. या सर्वेक्षणात जिल्ह्यातील ४३३ शेतकरी कुटुंबियांची माहिती प्रशासनाने संकलित केली असून या माहितीचे वर्गीकरणही झाले आहे. त्यानुसार २२ डिसेंबरपासून या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना विशेष योजनेच्याअंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्राधान्याने दिला जाणार असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
असा मिळणार योजनांचा लाभ
२०१२ पासून आजपर्यंत झालेल्या शेतकरी आत्महत्यांची माहिती घेऊन जिल्हा प्रशासनाने या शेतकरी कुटुंबियांना मदतीसाठी हात पुढे केला आहे. त्यात २१८ शेतकरी कुटुंबियांना रोजगाराभिमूख प्रशिक्षण दिले जाणार आहे. ११२ कुटुंबियांना आरोग्यविषयक उपचार दिले जाणार असून ३३८ कुटुंबियांना प्राधान्याने कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे २१२ शेतकºयांच्या शेतामध्ये वीज जोडणी देणे, १५६ शेतकºयांच्या घरी वीज जोडणी देणे, २६२ शेतकºयांना सिंचनासाठी विहीर उपलब्ध करुन देणे, २३४ कुटुंबियांना गॅस जोडणी देणे, २०६ कुटुंबियांना अन्न सुरक्षेचा लाभ, ७४ शेतकरी कुटुंबियांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ, ५२ शेतकरी कुटुंबियांना शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ देणे, १७२ शेतकºयांच्या पाल्यांना वसतिगृहाची सुविधा, २२० कुटुंबियांना शौचालय, २८९ कुटुंबियांना घरकुल, ६५ कुटुंबियांना कुटुंब अर्थसहाय्य योजनेचा तर २५१ आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत वेतन योजनेचा लाभ मिळवून दिला जाणार आहे. २१२ शेतकरी कुटुंबियांना राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जनधन खाते काढून दिले जाणार आहे.

Web Title: Parbhani: 433 families will get government help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.