परभणी: ३ हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:09 AM2019-04-20T00:09:57+5:302019-04-20T00:10:22+5:30

तीन वर्षापासून जिल्ह्यातील ३ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी कोटेशनची रक्कम भरुनही अद्याप त्यांना वीज जोडणीचे साहित्य महावितरण कंपनीकडून देण्यात आले नाही. परिणामी या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Parbhani: 3 thousand farmers wait for electricity connection | परभणी: ३ हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत

परभणी: ३ हजार शेतकरी वीज जोडणीच्या प्रतिक्षेत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी: तीन वर्षापासून जिल्ह्यातील ३ हजार शेतकऱ्यांनी कृषीपंपासाठी कोटेशनची रक्कम भरुनही अद्याप त्यांना वीज जोडणीचे साहित्य महावितरण कंपनीकडून देण्यात आले नाही. परिणामी या शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील शेतकरी एकीकडे दुष्काळाचा सामना करीत असताना दुसरीकडे मात्र शेतकºयांच्या हितार्थ असलेल्या वीज वितरण कंपनीकडूनच कृषीपंपधारकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. महावितरण कंपनीने जिल्ह्यामध्ये राबविलेल्या महावितरण आपल्या दारी या योजनेंतर्गत ज्या कृषी पंपाधारकांना वीज जोडणी आवश्यक आहे, त्या कृषीपंपधारकांनी या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ३ हजार शेतकºयांनी प्रत्येकी ६ हजार रुपयांचे कोटेशन भरुन या योजनेत सहभाग नोंदविला. त्यामुळे लवकरच कृषी पंपाच्या वीज जोडणीचे साहित्य देण्यात येईल, ही अपेक्षा बाळगणाºया शेतकºयांकडे महावितरणे पूर्णत: दुर्लक्ष केले आहे. गेल्या तीन वर्षापासून या शेतकºयांना केवळ जोडणी दिली आहे; परंतु, जोडणीसाठी लागणारे साहित्य अद्यापही देण्यात आले नाही. त्यामुळे याकडे महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंत्यांनी लक्ष देऊन तीन वर्षापासून साहित्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या कृषीपंपधारकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी शेतकºयांमधून होत आहे.
‘मुख्यमंत्री सौर योजनेत प्राधान्य द्या’
४महावितरण आपल्या दारी योजनेंतर्गत सहभागी होणाºया शेतकºयांना मुख्यमंत्री सौर योजनेत प्राधान्य देण्यात यावे, जेणेकरुन तीन वर्षापासून कृषीपंपाच्या साहित्यासाठी प्रतिक्षेत असलेल्या शेतकºयांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Parbhani: 3 thousand farmers wait for electricity connection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.