पोलीस ठाण्यातच घेतला पीक विमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 03:02 AM2017-07-31T03:02:33+5:302017-07-31T03:02:33+5:30

पीक विमा जमा करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असल्याने पाथरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गर्दी होऊन रेटारेटी नियंत्रणाबाहेर जात असल्याने रविवारी पोलिसांनी यावर तोडगा काढला.

paolaisa-thaanayaataca-ghaetalaa-paika-vaimaa | पोलीस ठाण्यातच घेतला पीक विमा

पोलीस ठाण्यातच घेतला पीक विमा

Next

पाथरी (जि. परभणी) : पीक विमा जमा करण्यासाठी दोन दिवस शिल्लक असल्याने पाथरी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत गर्दी होऊन रेटारेटी नियंत्रणाबाहेर जात असल्याने रविवारी पोलिसांनी यावर तोडगा काढला. शनिवारी अर्ज केलेल्या तब्बल ५०० शेतकºयांच्या विम्याची रक्कम चक्क पोलीस ठाण्यात स्वीकारण्यात आली.
पीकविमा भरण्यासाठी ३१ जुलैची डेडलाईन असल्याने तसेच आॅफलाइन अर्ज भरून घेण्यासाठी सुरुवात झाल्यानंतर शनिवारपासूनच शहरातील सर्वच बँकांसह जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कासापुरी, बाभूळगाव, गुंज व पाथरी येथील शाखांमध्येही शेतकºयांनी तोबा गर्दी केली. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार रविवारी देखील बँक शाखा सुरू ठेवण्यात आल्या होत्या. पाथरी शाखेत ५०० शेतकºयांचे अर्ज रात्रीच ठेवून घेण्यात आले, तर गुंज येथील शाखेत संतापलेल्या शेतकºयांनी शटर तोडले. त्यामुळे पोलिसांनी रात्रभर पहारा दिला.
आॅनलाइन अर्ज भरले जात असल्याने रविवारी सुटी असतानाही बँक शाखेचे कामकाज सुरू होताच जिल्हा बँकेत रेटारेटी सुरू झाली. बँकेत प्रवेश करण्यासाठी असलेल्या छोट्या रस्त्यावर कोंडी निर्माण झाली. शनिवारी अर्ज दिलेले शेतकरी व नव्याने आलेले शेतकरी असा वाद निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे यांनी शनिवारी आणि रविवारी आलेल्या शेतकºयांचे विभाजन करून पाचशे शेतकºयांच्या अर्जासह बँकेचे रोखपाल व इतर दोन कर्मचाºयांना पोलीस ठाण्यात नेले. सकाळी १०.३० पासून सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यातच या ५०० शेतकºयांच्या पीक विम्याचे पैसे स्वीकारण्यात आले.
शेतकºयांची प्रचंड गर्दी-
जालन्यात दिवसभर शेतकºयांची प्रचंड धावपळ पाहावयास मिळाली. सीएससी सेंटरची ‘क्रॉप इंश्युरन्स वेबसाइट’ दिवसभर डाऊन असल्याने शेतकºयांनी केंद्रासमोर रांगा लावल्या. दुसरीकडे पीकविमा भरण्यासाठी ग्रामीण व निमशहरी भागातील बँक रविवारी सुरू ठेवण्याच्या रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला अनेक बँकांनी केराची टोपली दाखविली. जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा वगळता अन्य बँका दिवसभर बंद होत्या. बीडमध्येही अनेक बँकांमध्ये शेतकºयांनी गर्दी केली होती. पश्चिम महाराष्ट्रात सातारा तसेच काही ठिकाणी असेच चित्र होते. जळगावात मात्र शेतकºयांचा थंड प्रतिसाद होता.

Web Title: paolaisa-thaanayaataca-ghaetalaa-paika-vaimaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.