मातीचा भराव खचल्याने खाजगी बस उलटून नऊ यात्रेकरू जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 06:23 PM2019-03-22T18:23:04+5:302019-03-22T18:28:19+5:30

अपघात होणार असल्याचे समजताच प्रवाशांनी सावध होत आरडाओरडा सुरू केला.

Nine pilgrims injured in private bus accident at Gangakhed | मातीचा भराव खचल्याने खाजगी बस उलटून नऊ यात्रेकरू जखमी

मातीचा भराव खचल्याने खाजगी बस उलटून नऊ यात्रेकरू जखमी

Next
ठळक मुद्देधारासुर पाटी ते रूमणा पाटी दरम्यानची घटना मातीचा भराव खचल्याने बसला अपघात

गंगाखेड (परभणी ) : खाजगी यात्रा कंपनीची बस पलटी झाल्याने अहमदनगर जिल्ह्यातील नऊ यात्रेकरू प्रवासी जखमी झाल्याची घटना आज दुपारी चार वाजेच्या सुमारास परभणी रस्त्यावरील धारासुर पाटी ते रूमणा पाटी दरम्यान घडली. येथे चालु असलेल्या रस्त्याच्या कामात टाकलेला काळ्या मातीचा भराव खचल्याने बसला अपघात झाल्याची प्रवास्यांमध्ये चर्चा आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील जेऊर येथील यात्रेकरूंना घेऊन एक खाजगी बस (एम एच १६ टी ८००८ ) गंगाखेड मार्गे परळी वैजनाथ येथे दर्शनासाठी जात होती. धारासुर पाटी ते रुमणा पाटी दरम्यान रस्त्याचे काम सुरु असून येथे काळ्या मातीचा भराव टाकण्यात आला आहे. येथे येताच काळ्या मातीचा भराव खचल्याने बस उलटली. बसला अपघात होणार असल्याचे समजताच प्रवाशांनी सावध होत आरडाओरडा सुरू केला. बस रस्त्याच्या खाली उलटताच येथुन जाणाऱ्या वाहनधारकांनी जखमींना बाहेर काढले. 

जखमींची नावे अशी :
१) महादेव निवृत्ती दारकुंडे वय ४५ वर्ष, २) शकुंतला खंडोजी बारसे वय ५० वर्ष, ३) रतन बाळासाहेब मगर वय ६० वर्ष, ४) शकुंतला रेवजी ससे वय ५५ वर्ष, ५) लंकाबाई अशोक पवार वय ४५ वर्ष, ६) ताराबाई गोरख तवले वय ५० वर्ष, ७) शकुंतला खंडोजी भालसिंग वय ६० वर्ष, ८) सुनिल रामभाऊ वाघमारे वय ४० वर्ष, ९) गोरख विठ्ठलराव बनकर वय ४० वर्ष ( सर्व राहणार जेऊर ता. जि. अहमदनगर ) 

Web Title: Nine pilgrims injured in private bus accident at Gangakhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.