गौगॅस...शेणापासून गॅस बनवण्याचा एक नवा उद्योग

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 03:31 PM2018-01-24T15:31:15+5:302018-01-25T10:05:51+5:30

शेणापासून गॅस बनवण्याचा एक नवा उद्योग

Gouguas ... a new industry for cooking gas | गौगॅस...शेणापासून गॅस बनवण्याचा एक नवा उद्योग

गौगॅस...शेणापासून गॅस बनवण्याचा एक नवा उद्योग

googlenewsNext

- मयूर देवकर

कौशिकच्या घरी ना शेती, ना तो कधी खेड्यात राहिला. पण हैदराबादच्या कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी केल्यानं तो शेती आणि ग्रामीण जीवनाशी कायमचा जोडला गेला. शेती आणि शेतकºयांची दुर्दशा पाहून चलबिचल सुरु झाली. दरम्यान, त्यानं दिल्लीच्या ‘द एनर्जी अँड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’मध्ये रीन्यूएबल एनर्जी विषयात एम.टेक.साठी प्रवेश घेतला. तिथं त्याला त्याच्यासारखेच ग्रामीण विकासाच्या ध्येयानं प्रेरित झालेले दोन मित्र भेटले. पीयूष सोहनी आणि शंकर रामकृष्णन.
एका ‘एनजीओ’सोबत काम करताना ते सिरोही नावाच्या एका खेड्यात गेले. दिल्लीपासून फक्त ३५ किमी दूर असलेल्या या गावात ९० टक्के घरांत साधा स्वयंपाकासाठीचा गॅस नव्हता. ७० टक्के घरांमध्ये उपजीविकेची साधनं नव्हती. आपल्या शिक्षणाचा ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी उपयोग झाला पाहिजे, असं डोक्यात चक्र सुरू झालं.
मध्यंतरी ‘हस्क पॉवर सिस्टिम’मध्ये इंटर्नशिप करत असताना कौशिकची ग्यानेश पांडेशी भेट झाली. ग्यानेश अमेरिका सोडून बिहारच्या गावांमध्ये वीज आणण्यासाठी काम करतो. त्याच्याच सल्ल्यानुसार एम.टेक .पूर्ण झाल्यावर या तीन दोस्तांनी तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जीवनस्तर उंचावण्यासाठी एक कंपनी स्थापन केली. त्यासाठी पीयूष आणि शंकरची स्कॉलरशिप आणि आयआयटी मद्रास रिसर्च पार्कच्या विलोग्रो इनोव्हेशन फाउंडेशनची दहा लाख रुपयांची आर्थिक मदत मिळाली.
किशोर सांगतो, ‘ग्रामीण भागातील सुमारे आठ कोटी कुटुंबांकडे गुरे-ढोरे आहेत. त्यापैकी अर्ध्या जणांच्या घरी दररोजच्या स्वयंपाकासाठी लागणाºया बायोगॅसची निर्मिती करण्याइतपत जागा आणि शेणखत आहे. तरीदेखील भारतातील ८६ टक्के लोक सरपण आणि शेणाच्या गोवºया इंधन म्हणून वापरतात. मग आम्ही ठरवलं की कमी खर्चात बायोगॅस निर्मितीचं तंत्र विकसित करायचं !’
२०१३ साली या तिघांनी स्टार्टअप सुरू केलं. त्याला नाव दिलं, ‘सस्टेनअर्थ एनर्जी सोल्यूशन्स’. हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटका यासारख्या गुरांची संख्या जास्त असणाºया दहा राज्यांचा सहा-सात महिने सखोल अभ्यास केला. त्यातून लक्षात आलं की, बायोगॅस तयार करण्याचे नवे तंत्रज्ञान विकसित करण्याची गरज नाही. जे आहे ते वापरणं अवघड असल्याने लोकं त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकांना पटकन विकत घेऊन लगेच वापरता येणारी, जास्त किचकट नसणारी वस्तू आवडत असते हे लक्षात घेऊन त्यांनी एक प्री-फॅब्रिकेटेड फ्लेक्सिबल बॅगसारखा बायोगॅस प्लँट तयार केला. कोणाच्याही मदतीशिवाय दोनच दिवसांत तो बसवता येतो. २०१५ साली त्यांनी ‘गौगॅस’ नावाचा पहिला प्रकल्प तिरुपतीजवळील एका खेड्यातील शेतकºयाकडे बसवला. तिथून त्यांचं हे गौगॅसचं काम जोरात सुरु झालं. सध्या कौशिक आणि टीम मेक्सिकोच्या ‘सिस्टिमा बायोबोल्सा’ कंपनीसोबत मिळून काम करते.
कौशिक म्हणतो, एकीकडे आपण मेट्रोमधून फिरतो, सर्व सुखसुविधांवर जगतोय आणि खेड्यांमध्ये लोक अन्न, पाणी, वस्त्र, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण अशा मूलभूत सुविधांपासूनही वंचित आहेत. समाजातील ही दरी भरून काढणं आपली नैतिक जबाबदारी आहे’.

भविष्यात स्कोप काय?
आॅर्गेनिकची चलती असणाºया नव्या जगात अशा ‘देशी’ उद्योगांना स्कोप आहे. फक्त नजर नवी हवी.

कौशल्य काय हवीत?
खरं तर इच्छाशक्ती हवी आपण
आपल्या अवतीभोवतीची साधनं कल्पकेनं वापरण्याची?
डिप्लोमा किंवा इंजिनिअरिंग, बी.टेक. झालेल्यांनी थोडा कल्पक विचार केला
तर अशा आयडिया सुचू शकतात.
 

Web Title: Gouguas ... a new industry for cooking gas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.