विराटला का झालं होतं हसू अनावर ? जडेजाने केला खुलासा

By admin | Published: April 28, 2017 03:07 PM2017-04-28T15:07:10+5:302017-04-28T15:07:10+5:30

काही दिवसांपुर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली मैदानात रवींद्र जडेजाची खिल्ली उडवत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता

Why was Viratla happy? Jadeja revealed the ban | विराटला का झालं होतं हसू अनावर ? जडेजाने केला खुलासा

विराटला का झालं होतं हसू अनावर ? जडेजाने केला खुलासा

Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 28 - काही दिवसांपुर्वी भारतीय कर्णधार विराट कोहली मैदानात रवींद्र जडेजाची खिल्ली उडवत असतानाचा फोटो व्हायरल झाला होता. यावेळी विराट कोहली जडेजाच्या नवीन लूकची खिल्ली उडवत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र आता स्वत: जडेजाने त्यावेळी असं काय झालं होतं ज्यावरुन विराटला हसू अनावर झालं होतं याचा खुलासा केला आहे.
 
"राजपूतव"रुन आलं हसू -
जडेजाने एका मुलाखतीत सांगितलं आहे की, "तो फोटो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत होणा-या सामन्याआधीचा आहे. त्यावेळी विराट मला राजपूत म्हणून हाक मारत होता. त्याने हे माझं टोपण नाव ठेवलं आहे. जेव्हा कधी विराट मला राजपूत म्हणून हाक मारतो  तेव्हा मला गर्व होतो. मी आणि विराट भावासारखे असून हा क्षण आमच्या त्या नात्याचा एक भाग आहे". 
18 एप्रिल रोजी गुजरात लायन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान सामना झाला. सामना संपल्यानंतर हा फोटो खूप व्हायरल झाला होता. जडेजाच्या नवीन लूकची खिल्ली उडवत विराट कोहली हसत आहे असं सांगण्यात येत होतं. राजकोटमध्ये झालेला हा सामना बंगळुरुने 21 धावांनी जिंकला होता. 
 
का काढली दाढी - 
जडेजा म्हणतो, "ड्रेसिंग रुममध्ये सगळेच एकसारखे दिसू लागले होते. म्हणून मी सगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं ठरवलं. एकदा मी मान खाली घालून बसलो असताना अनिल कुंबळे आले. त्यांना वाटलं मी के एल राहुल आहे आणि त्यांनी कन्नडमध्ये बोलायला सुरुवात केली. दाढीमुळे संघात खूप गोंधळ होत आहे".
 
जडेजाने आपला लूक चेंज करण्याआधी व्हिडीओही ट्विटरवर शेअर केला होता. 
 

Web Title: Why was Viratla happy? Jadeja revealed the ban

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.