गुजरात लायन्ससमोर 155 धावांचं लक्ष्य

By admin | Published: May 1, 2016 05:49 PM2016-05-01T17:49:29+5:302016-05-01T17:49:29+5:30

इंडियन प्रीमिअर लीगच्या म्हणजेच आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात लायन्स संघासमोर किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं 155 धावांचं लक्ष्य ठेवलं

Target of 155 runs against Gujarat Lions | गुजरात लायन्ससमोर 155 धावांचं लक्ष्य

गुजरात लायन्ससमोर 155 धावांचं लक्ष्य

Next

ऑनलाइन लोकमत

राजकोट, दि. 1- इंडियन प्रीमिअर लीगच्या म्हणजेच आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी असलेल्या गुजरात लायन्स संघासमोर किंग्ज इलेव्हन पंजाब संघानं 155 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. राजकोटवर सुरू असलेल्या सामन्यात सर्वच्या सर्व गडी गमावून किंग्ज इलेव्हन पंजाबनं 19.5 षटकांत 154 धावा केल्या आहेत. एम. विजयनं 41 चेंडूंमध्ये 6 चौकार लगावत 55 धावा काढून विजयी घोडदौडीला सुरुवात करून दिली. एम.पी. स्टॉनिसनंही शानदार खेळी खेळत 17 चेंडूंमध्ये 1 षटकार आणि 3 चौकार ओढत 27 धावा केल्या आहेत. मिलरनं 27 चेंडूंमध्ये 2 चौकार ओढत 31 धावा कुटल्यात. तर साहानं 19 चेंडूंमध्ये 4 चौकार लगावत 33 धावा काढल्या आहेत. शर्मा 1, करिप्पा 1, संदीप शर्मा नाबाद 1 धावा काढल्या.  मॅक्सवेल आणि पटेल भोपळाही न फोडता माघारी परतले. तर मार्शनं 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धावा काढून बाद झाला. गुरुकीरत सिंगही धावबाद झाला. या लढतीत विजय मिळवून आपले स्थान अधोरेखित करण्याची संधी किंग्ज इलेव्हन पंजाबसमोर आहे. तर गुजरात लायन्ससमोर 155 धावांचं आव्हान मोडून काढून आपलं स्थान पक्कं करण्याची संधी आहे. 
 

Web Title: Target of 155 runs against Gujarat Lions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.