स्टीपलचेस धावपटू नवीन डागर डोपमध्ये अडकला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 04:51 AM2018-08-03T04:51:10+5:302018-08-03T04:51:24+5:30

आगामी आशियाडची तयारी करणारा स्टीपलचेसचा धावपटू नवीन डागर डोपमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत नवीनने प्रतिबंधित मेलोडोनियम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

Steeplechase caught the run of New Dagar Dope | स्टीपलचेस धावपटू नवीन डागर डोपमध्ये अडकला

स्टीपलचेस धावपटू नवीन डागर डोपमध्ये अडकला

Next

नवी दिल्ली : आगामी आशियाडची तयारी करणारा स्टीपलचेसचा धावपटू नवीन डागर डोपमध्ये पॉझिटिव्ह आढळला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या आंतरराज्य अ‍ॅथ्लेटिक्स स्पर्धेत नवीनने प्रतिबंधित मेलोडोनियम घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.
डागरने २०१४ च्या इंचियोन आशियाडचे कांस्य जिंकले होते. गुवाहाटीत त्याने ८.४१ सेकंद वेळ नोंदवून पात्रता सिद्ध केली होती. राष्टÑीय डोपिंग एजन्सीने (नाडा) स्पर्धेदरम्यान घेतलेल्या चाचणीत
तो पॉझिटिव्ह आढळला असून, भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स महासंघाने २३ जुलै रोजी डागरवर अस्थायी निलंबनाची कारवाई केल्याची माहिती आहे.
डागरच्या निलंबनामुळे इंडोनेशियात होणाऱ्या आशियाडमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेस प्रकारात कुणीही भारताचे प्रतिनिधित्व करणार नाही. या आठवड्याच्या सुरुवातीला भालाफेकपटू अमितकुमार डोप चाचणीत पॉझिटिव्ह आढळल्याने त्याला फिनलॅन्डच्या एका स्पर्धेतून बाहेर काढण्यात आले होते.
डागरच्या निकटवर्तीयांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार डागर सध्या भूतानमध्ये मध्यम आणि लांब पल्ल्याच्या धावपटूंसोबत डोंगरावर सराव करण्यात व्यस्त आहे. तो मेलोडोनियम सेवनात दोषी आढळला. त्याच्या ‘ब’ं नमुन्याची प्रतीक्षा आहे. तथापि नाडा आणि एएफआयने यासंदर्भात अद्याप वक्तव्य दिलेले नाही. (वृत्तसंस्था)

स्टीपलचेस धावपटू
नवीन डागर डोपमध्ये अडकला

Web Title: Steeplechase caught the run of New Dagar Dope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा