आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी मकरंद जोशी यांची निवड

By admin | Published: August 26, 2014 11:28 PM2014-08-26T23:28:43+5:302014-08-26T23:28:43+5:30

औरंगाबाद : एरोबिक जिम्नॅस्टिक्सच्या प्रसारासाठी क्रीडा मार्गदर्शकांसाठी आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी डॉ़ मकरंद जोशी यांच्या निवड झाली आहे़ आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघातर्फे (फिग) आयोजित ही कार्यशाळा फिलिपाईन्समधील मनीला येथे ३० ऑगस्ट पासून आयोजित करण्यात आली आहे़

The selection of Makrand Joshi for the international workshop | आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी मकरंद जोशी यांची निवड

आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी मकरंद जोशी यांची निवड

Next
ंगाबाद : एरोबिक जिम्नॅस्टिक्सच्या प्रसारासाठी क्रीडा मार्गदर्शकांसाठी आयोजित आंतरराष्ट्रीय कार्यशाळेसाठी डॉ़ मकरंद जोशी यांच्या निवड झाली आहे़ आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक्स महासंघातर्फे (फिग) आयोजित ही कार्यशाळा फिलिपाईन्समधील मनीला येथे ३० ऑगस्ट पासून आयोजित करण्यात आली आहे़
भारतीय जिम्नॅस्टिक्स महासंघातर्फे डॉ़ जोशी यांची निवड करण्यात आली आहे़ जोशी यांनी यापुर्वी २००६ मध्ये चीनमधील नानचिंग येथे झालेल्या जागतिक एरोबिक जिम्नॅस्टिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाचे मार्गदर्शक म्हणुन काम पाहिले आहे़ तसेच त्यांनी २०१० मध्ये झालेल्या अशियाई एरोबिक चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाचे प्रशिक्षक पद भुषविले होते़
निवडीबद्दल मसांमचे अध्यक्ष शरद भोगले, सचिव रामभाऊ पातुरकर, प्राचार्य प्रदीप दुबे, जिल्हा संघटनेचे अध्यक्ष ॲड़ संकर्षण जोशी, प्रा़ सागर कुलकर्णी यांनी अभिनंदन केले आहे़ (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: The selection of Makrand Joshi for the international workshop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.