प्रत्येक जिल्ह्यात अ‍ॅथलेटिक्स पोहोचविण्यास प्राधान्य : उचिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 04:26 AM2018-05-17T04:26:02+5:302018-05-17T04:26:02+5:30

राज्याच्या कानाकोपऱ्यात अ‍ॅथलेटिक्सचा प्रचार करण्यास प्राधान्य देण्यात येत असून त्यासाठी सर्व ठिकाणी सिंथेटिक टॅÑक उभारण्याची शासनाकडे मागणी करू, अशी माहिती महाराष्टÑ राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे नवनिर्वाचित सचिव सतीश उचिल यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

Prefer to deliver athletics in every district: Uchil | प्रत्येक जिल्ह्यात अ‍ॅथलेटिक्स पोहोचविण्यास प्राधान्य : उचिल

प्रत्येक जिल्ह्यात अ‍ॅथलेटिक्स पोहोचविण्यास प्राधान्य : उचिल

Next

नागपूर : राज्याच्या कानाकोपऱ्यात अ‍ॅथलेटिक्सचा प्रचार करण्यास प्राधान्य देण्यात येत असून त्यासाठी सर्व ठिकाणी सिंथेटिक टॅÑक उभारण्याची शासनाकडे मागणी करू, अशी माहिती महाराष्टÑ राज्य अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे नवनिर्वाचित सचिव सतीश उचिल यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली. खासदार क्रीडा महोत्सवातील अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या पुरस्कार सोहळ्यासाठी ते नागपुरात आले होते.
राज्यात अ‍ॅथलेटिक्समध्ये भरपूर टॅलेंट असल्याचे नमूद करीत उचिल म्हणाले, ‘आधीच्या कार्यकाळात अ‍ॅथलेटिक्स पुणे- नाशिकपर्यंत मर्यादित होते. आता असे होणार नाही. सर्वत्र स्पर्धा होण्यासाठी प्रयत्न करू.’
स्वत: वेगवान धावपटू राहिलेले उचिल हे मुंबई शहराचे प्रतिनिधित्व करतात. पदावर आल्यानंतर ज्या दोन स्पर्धांचे आयोजन केले त्यात ‘ फोटो फिनिश’ लागू केल्याचे सांगून आगामी काळात अ‍ॅथलेटिक्सची नाळ आधुनिकतेशी जोडण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गडचिरोली आणि यवतमाळसारख्या ठिकाणीदेखील संघटनांचा कारभार सुरळीत होण्यासाठी लक्ष घालू असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले. आगामी राज्य ज्युनियर गट अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेचे नागपुरात आयोजन होणार असल्याचे संकेत देत आयोजनासाठी व्यवस्था पाहण्यासाठीच आपण नागपुरात आलो आहे. नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेने मागणी केल्यानुसार विभागीय क्रीडा संकुल परिसरातील सिंथेटिक ट्रॅकची पाहणी केल्यानंतर स्पर्धा आयोजनाचा निर्णय होईल, असे ते म्हणाले.

Web Title: Prefer to deliver athletics in every district: Uchil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.