ऑनलाइन लोकमत
 
दुबई, दि. 15 - पाकिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू उमर अकमलच्या नावावर एका लाजिरवाण्या विक्रमाची नोंद झाली आहे. नुकत्याच झालेल्या पाकिस्तान सुपर लीगच्या (पीएसएल) एका सामन्यात तो शून्यावर बाद झाला आणि यासोबत टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक शून्यावर बाद होण्याचा रेकॉर्ड त्याच्या नावे जमा झाला. लाहोर कलंदर्स या संघाकडून खेळताना अकमल गेल्या तीन दिवसात दोन वेळेस शून्यावर आऊट झाला आहे.
 
आतापर्यंत उमर अकमल टी-20 करिअरमध्ये 24 वेळेस शून्यावर बाद झाला असून  त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्शल गिब्जला मागे टाकलं आहे. गिब्ज 167 डावांमध्ये 23 वेळेस शून्यावर आऊट झाला होता. त्याच्या खालोखाल  श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान आणि वेस्ट इंडिजच्या ड्वेन स्मिथचा नंबर लागतो. 
 
दिलशान 217 डावांमध्ये 23 वेळेस तर स्मिथ 270 डावांमध्ये 23 वेळेस शून्यावर बाद झाले आहेत.