मनोज पदकाचा प्रबळ दावेदार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2018 03:46 AM2018-03-28T03:46:47+5:302018-03-28T03:46:47+5:30

अनुभवी बॉक्सर अखिल कुमारने आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत मनोज कुमारला बॉक्सिंगमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे.

Manoj Padak's dominant claimant | मनोज पदकाचा प्रबळ दावेदार

मनोज पदकाचा प्रबळ दावेदार

Next

नवी दिल्ली : अनुभवी बॉक्सर अखिल कुमारने आगामी राष्ट्रकुल स्पर्धेत मनोज कुमारला बॉक्सिंगमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी, दिग्गज थाळीफेकपटू कृष्णा पुनियाला भालाफेकमध्ये ज्युनिअर विश्वविक्रमवीर नीरज चोप्राकडून तशी अपेक्षा आहे.
गोल्ड कोस्टमध्ये ४ ते १५ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये आयोजित ‘रंग दे तिरंगा’ शुभेच्छा संदेश कार्यक्रमामध्ये माजी हॉकी कर्णधार जफर इक्बालने भारतीय महिला व पुरुष हे दोन्ही संघ समतोल असल्याचे सांगितले. तसेच, नेमबाज मुराद अली खानने नेमबाजीमध्ये ८० टक्के स्पर्धांमध्ये पदकाची आशा व्यक्त केली.
भारतातर्फे १२ बॉक्सर्स या स्पर्धेत सहभागी होत आहेत. त्यात ८ पुरुष व ४ महिलांचा समावेश आहे. मनोजने (६९ किलो) दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले होते तर विकासने (७५ किलो) आशियाई स्पर्धेत (२०१०) अशी कामगिरी केली होती. पाचवेळा विश्वविजेतेपदाचा मन मिळवणाºया मेरीकोमने आशियाई स्पर्धेत (२०१४) सुवर्ण मिळवले होते, पण तिलाही पहिल्या राष्ट्रकुल पदकाची प्रतीक्षा आहे.

मेलबर्न राष्ट्रकुल २००६ मध्ये सुवर्णपदकाचा मानकरी ठरलेला अखिल म्हणाला, ‘मनोज २०१० पासून राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होत आहे. त्याने २०१० मध्ये सुवर्णपदक पटकावले होते आणि यावेळी त्याच्याकडे या स्पर्धेत दुसरे सुवर्णपदक पटकावित इतिहास नोंदवण्याची चांगली संधी आहे. या व्यतिरिक्त एम.सी. मेरीकोम व विकास कृष्ण यांच्याकडूनही चमकदार कामगिरीची आशा आहे.’

पुनिया म्हणाली, ‘गेल्या काही वर्षांमध्ये आमच्या खेळाडूंची कामगिरी उंचावली आहे. नीरजकडून (भालाफेक) सर्वांना अपेक्षा आहे. त्याच्यावर दडपण निर्माण करायला नको, पण तो पदकाचा प्रबळ दावेदार आहे. या व्यतिरिक्त पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत (तेजस्विन शंकर) आणि तिहेरी उडी स्पर्धेत (अरपिंदर सिंग) व महिलांच्या लांब उडी स्पर्धेत (नीना वराकिल) आणि थाळीफेकमध्ये (सीमा पुनिया व नवजीत कौर) चांगल्या कामगिरीची आशा आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाºया खेळाडूची प्रशंसा करायला हवी, असेही पुनियाने म्हटले आहे.
पुनियाने सांगितले की,‘ज्यावेळी एखादा खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतो त्यावेळी त्याला पदकाची संधी असते. दीपा करमाकरचे उदाहरण आपल्यापुढे आहे. रिओ आॅलिम्पिकमध्ये तिने सर्वोत्तम कामगिरी केली. खेळाडूंनी स्वत:वर कुठलेही दडपण घेऊ नये.’

Web Title: Manoj Padak's dominant claimant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.