आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला ‘गर्व’ वाटेल अशी कामगिरी करा- राजनाथ सिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 05:39 AM2018-03-23T05:39:52+5:302018-03-23T05:39:52+5:30

विदेशी भूमीत देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करा. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूने पदक जिंकल्यास संपूर्ण देशाची मान गर्वाने उंचावते. आमचे खेळाडू ही भावना वाढीस लावण्यात यशस्वी होतील, या शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल दरम्यान आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

Make the country feel proud of the international level: Rajnath Singh | आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला ‘गर्व’ वाटेल अशी कामगिरी करा- राजनाथ सिंग

आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाला ‘गर्व’ वाटेल अशी कामगिरी करा- राजनाथ सिंग

googlenewsNext

नवी दिल्ली: विदेशी भूमीत देशाला गर्व वाटेल अशी कामगिरी करा. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय खेळाडूने पदक जिंकल्यास संपूर्ण देशाची मान गर्वाने उंचावते. आमचे खेळाडू ही भावना वाढीस लावण्यात यशस्वी होतील, या शब्दात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी गोल्ड कोस्ट येथे ४ ते १५ एप्रिल दरम्यान आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सहभागी होत असलेल्या भारतीय खेळाडूंना
शुभेच्छा दिल्या. २२२ भारतीय
खेळाडू स्पर्धेत सहभागी होत असून २०१० च्या राष्टÑकुलनंतर हे सर्वांत मोठे पथक आहे.
यंदा जलतरण, अ‍ॅथ्लेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बॉक्सिंग, सायकलिंग, जिम्नॅस्टिक, हाौकी, लॉन बॉल्स, नेमबाजी, स्क्वॅश, टेबल टेनिस, भारोत्तोलन, कुस्ती आणि पॅरालिम्पिक अशा १५ प्रकारात भारतीय खेळाडूंचा समावेश असेल. अ‍ॅथलेटिक्स, लॉन बॉल्स, बॉक्सिंग, भारोत्तोलन, बास्केटबॉल हे संघ आधीच गोल्ड कोस्टमध्ये दाखल झाले आहेत. केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी विदेशात आम्हाला नाचक्की झेलावी लागेल, असे काहीही न करण्याचे खेळाडूंना आवाहन केले.
भारताने २०१० च्या नवी दिल्ली राष्टÑकुल स्पर्धेत ३८ सुवर्णांसह १०१ पदके जिंकली होती. त्यानंतर २०१४ मध्ये १५ सुवर्णांसह ६४ पदके जिंकली. विदेशी भूमीत भारताची सर्वोत्कृष्ट कामगिरी मॅन्चेस्टर स्पर्धेत राहिली. त्यावेळी ३० सुवर्णांसह एकूण ६९ पदकांची कमाई झाली होती.
भारत त्यावेळी चौथ्या स्थानावर
होता. (वृत्तसंस्था)

Web Title: Make the country feel proud of the international level: Rajnath Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.