जोकोविन, सेरेना सरस

By admin | Published: September 1, 2014 01:38 AM2014-09-01T01:38:21+5:302014-09-01T01:38:21+5:30

सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि अमेरिकेची सेरेना विलियम्स यांनी यु एस ओपन स्पर्धेतील आपली विजयी लय कायम राखत चौथ्या फेरीत प्रवेश केला

Jokovin, Serena Mustache | जोकोविन, सेरेना सरस

जोकोविन, सेरेना सरस

Next

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर विराजमान असलेल्या सर्बियाचा नोवाक जोकोविच आणि अमेरिकेची सेरेना विलियम्स यांनी यु एस ओपन स्पर्धेतील आपली विजयी लय कायम राखत चौथ्या फेरीत प्रवेश केला; परंतु महिला गटात तिसऱ्या मानांकित पेत्रा क्वितोवा हिला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे विम्बल्डन चॅम्पियन क्वितोवाचा या स्पर्धेतील प्रवास इथवरच थांबला.
२०११ चा चॅम्पियन जोकोविच याने अमेरिकेच्या सॅम क्वेरी याला ८५ मिनिट चाललेल्या लढतीत ६-३, ६-२, ६-२ असे नमवून चौथ्या फेरीत स्थान पक्के केले. जोकोविचचा पुढील मुकाबला २२व्या मानांकित जर्मनीच्या फिलिप कोलक्रीबर याच्याशी होईल. त्याने तिसऱ्या फेरीत १३ व्या मानांकित अमेरिकेच्या जॉन इस्नर याचा अटीतटीच्या लढतीत ७-६, ४-६, ७-६, ७-६ असा पराभव केला. दुसऱ्या लढतीत ब्लॉज कावकिक याने माघार घेतल्याने तिसऱ्या मानांकित स्वित्झर्लंडच्या वावरिंका स्लोवेनियाला चौथ्या फेरीत प्रवेश करता आला. आठव्या मानांकित ब्रिटनच्या अँडी मरेने रुसच्या आंद्रे कुज्नेत्सोवचा ६-१, ७-५, ४-६, ६-२ असा पराभव केला, तर फ्रान्सच्या विल्फ्रेड त्सोंगाने स्पेनच्या पाब्लो कैरेनोवर ६-४, ६-४, ६-४ असा सहज विजय साजरा केला. पाचव्या मानांकित मिलॉस राओनिके विक्टर इस्ट्रलाचा ७-६, ७-६, ७-६ असा, तर जपानच्या केई निशिकारोने लियानार्डो मेयेरचा ६-२, ६-२, ६-३ असा पराभव करून आगेकूच केली.
महिला गटात सेरेनाने अमेरिकेच्याच वारवरा लेपचेंकोचा ६-३, ६-३ असा फडशा पाडला. तिचा पुढील सामना काईआ कनेपी हिच्याविरुद्ध आहे. कनेपीने तिसऱ्या फेरीत १५व्या मानांकित स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारो हिचा ७-५, ६-० असा पराभव केला. कॅनडाच्या युजिनी बुकार्ड हिनेही विजयी अभियान कायम राखले आहे. यंदा झालेल्या तिन्ही ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेत तिने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती आणि यु एस ओपनमध्ये याच कामगिरीची अपेक्षा तिच्याकडून आहे. बुकार्ड हिने झेक प्रजासत्ताकच्या बारबोरा स्ट्रिकोवाचा ६-२, ६-७, ६-४ असा पराभव केला आणि पुढील फेरीत तिला जरिना डियासचा पराभव करणाऱ्या रुसच्या एकाटेरिना माकारोवा हिच्याविरुद्ध खेळावे लागेल.

Web Title: Jokovin, Serena Mustache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.