आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 04:15 AM2019-03-07T04:15:07+5:302019-03-07T04:15:14+5:30

भारत सरकारने पाकिस्तानी नेमबाजांना नाकारलेला व्हिसा चांगलाच महाग पडण्याची शक्यता आहे.

International threat to host competition | आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद धोक्यात

आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे यजमानपद धोक्यात

Next

नवी दिल्ली: भारत सरकारने पाकिस्तानी नेमबाजांना नाकारलेला व्हिसा चांगलाच महाग पडण्याची शक्यता आहे. या मुद्यावर आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक संघटना (आयओसी) जगभरातील क्रीडा संघटनांबरोबर चर्चा करत आहे. जर आयओसीने भारताला आंतरराष्टÑीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन न देण्याचा निर्णय घेतला, तर भविष्यात भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच भारतात जागतिक नेमबाजी स्पर्धा झाली. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पाकिस्तानच्या नेमबाजांनी भारताकडे व्हिसा मागितला होता. मात्र भारत सरकारने या खेळाडूंना व्हिसा नाकारला होता. यामुळे आंतरराष्टÑीय आॅलिम्पिक संघटनेने याविषयी नाराजी व्यक्त केली होती.
आयओसीने अनेक जागतिक संघटनांना भारतापासून अंतर ठेवावे असे आवाहन केले आहे. त्याचबरोबर युनायटेड कुस्ती संघटनेने भारताबरोबरचे क्रीडा संबंध संपवण्याची मागणी केली आहे.
जर आयओसीने निर्णय घेतला, तर भारतात या वर्षी होत असलेल्या आशियाई ज्युनियर कुस्ती स्पर्धेचे आयोजन धोक्यात येणार आहे. या प्रकरणात भारतीय कुस्ती संघटनेने क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंग राठोड
यांना लक्ष घालण्याची विनंती
केली आहे.

Web Title: International threat to host competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.