Asian Games 2023 : भारताच्या खात्यात विसावं 'सुवर्ण पदक', दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंगची कमाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 12:28 PM2023-10-05T12:28:27+5:302023-10-05T12:28:45+5:30

चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला असून भारतीय शिलेदारांनी विक्रमी पदकांची कमाई केली.

GOLD MEDAL No. 20 for INDIA in asian games 2023, dinesh karthik wife Dipika Pallikal and Harinder Pal Singh won Gold medal in Mixed Doubles | Asian Games 2023 : भारताच्या खात्यात विसावं 'सुवर्ण पदक', दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंगची कमाल

Asian Games 2023 : भारताच्या खात्यात विसावं 'सुवर्ण पदक', दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंगची कमाल

googlenewsNext

चीनमध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेचा थरार रंगला असून भारतीय शिलेदारांनी विक्रमी पदकांची कमाई केली. भारतीय संघाचा स्टार फलंदाज दिनेश कार्तिकच्या पत्नीने भारताला सुवर्ण मिळवून देण्यात हातभार लावला. कारण कार्तिकची पत्नी दीपिका पल्लीकलने चीनमध्ये सातासमुद्रापार देशाची शान वाढवली आहे. तिने स्क्वॅश मिश्र दुहेरीत चमकदार कामगिरी केली आणि अंतिम सामन्यात मलेशियाचा पराभव करून सुवर्ण पदक पटकावले. अव्वल मानांकित भारतीय जोडीने अंतिम फेरीत द्वितीय मानांकित मलेशियाच्या जोडीचा २-० असा पराभव केला. दीपिका पल्लीकल आणि हरिंदरपाल सिंग यांनी मिश्र दुहेरीत सुवर्ण पदक जिंकले.

दीपिकाची आशियाई स्पर्धेतील कामगिरी चमकदार राहिली आहे. तिने या पर्वात आतापर्यंत भारताला २ पदके मिळवून दिली. दीपिकाने सांघिक स्पर्धेत प्रथम २ कांस्यपदक जिंकले आणि आता मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात अप्रतिम कामगिरी सुवर्ण जिंकले.  दीपिकाचे हे एकूण सहावे पदक आहे. तिला आतापर्यंत एकाही स्पर्धेत सुवर्ण जिंकण्यात यश आले नव्हते. पण, यावेळी दीपिकाने सुवर्ण पदकावर शिक्कामोर्तब केला.

२०१० मध्ये जिंकले होते पहिले पदक
दीपिका पल्लीकलने २०१० मध्ये पहिले पदक जिंकले होते. कांस्य पदक जिंकून दीपिकाने पदकांचे खाते उघडले. यानंतर २०१४ मध्ये १ रौप्य, २ कांस्य, २०१८ मध्ये १ कांस्य आणि आता तिने सुवर्ण जिंकले. यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Web Title: GOLD MEDAL No. 20 for INDIA in asian games 2023, dinesh karthik wife Dipika Pallikal and Harinder Pal Singh won Gold medal in Mixed Doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.