बेनसिच रॉजर्स कपची मानकरी

By Admin | Published: August 17, 2015 10:48 PM2015-08-17T22:48:53+5:302015-08-17T22:48:53+5:30

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विलियम्सला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का देणाऱ्या स्वित्झर्लंडच्या बेनसिचने अंतिम

Benfica Rogers Cup Honor | बेनसिच रॉजर्स कपची मानकरी

बेनसिच रॉजर्स कपची मानकरी

googlenewsNext

टोरांटो : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या सेरेना विलियम्सला उपांत्य फेरीत पराभवाचा धक्का देणाऱ्या स्वित्झर्लंडच्या बेनसिचने अंतिम फेरीत सिमोना हालेपचा पराभव करीत डब्ल्यूटीए रॉजर्स कप टेनिस स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला. बेनसिच अंतिम फेरीत ७-६, ६-७, ३-० ने आघाडीवर असताना रोमानियाच्या हालेपने सामन्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. बेनसिचने तिसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला दोनदा हालेपची सर्व्हिस भेदली. हालेपला दमट हवामानामुळे कोर्टवर टिकाव धरता आला नाही. १८ वर्षीय बेनसिचचे हे कारकिर्दीतील दुसरे डब्ल्यूटीए विजेतेपद आहे. यापूर्वी जून महिन्यात तिने इस्तबोर्नमध्ये जेतेपदाचा मान मिळवला होता. या आठवड्याच्या सुरुवातीला बेनसिच जागतिक क्रमवारीत २० व्या स्थानावर होती. या जेतेपदानंतर ताज्या क्रमवारीत तिने १२ व्या स्थानावर झेप घेतली. (वृत्तसंस्था)

Web Title: Benfica Rogers Cup Honor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.