पनवेलमध्ये सिडको अध्यक्षांकडून मान्सूनपूर्व कामांचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 12:56 AM2019-06-08T00:56:36+5:302019-06-08T00:56:52+5:30

सकाळी १० वाजल्यापासून प्रशांत ठाकूर यांनी सिडको हद्दीतील राजीव गांधी मैदान, शहीद तुषार चव्हाण उद्यान, रस्ते आणि गटारांच्या कामांची पाहणी केली.

Review of monsoon works by the CIDCO president at Panvel | पनवेलमध्ये सिडको अध्यक्षांकडून मान्सूनपूर्व कामांचा आढावा

पनवेलमध्ये सिडको अध्यक्षांकडून मान्सूनपूर्व कामांचा आढावा

Next

पनवेल : सिडकोचे अध्यक्ष, आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी नवीन पनवेलमधील विविध ठिकाणी भेटी घेत मान्सूनपूर्व कामांचा आढावा घेतला. नवीन पनवेलमधील आदई तलावाचा गणेश विसर्जन घाट, नवीन पनवेल सेक्टर ११ मधील उद्यानातील दुरुस्ती, रस्ते आणि गटारांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना प्रशांत ठाकूर यांनी सिडको अधिकाऱ्यांना दिल्या.

सकाळी १० वाजल्यापासून प्रशांत ठाकूर यांनी सिडको हद्दीतील राजीव गांधी मैदान, शहीद तुषार चव्हाण उद्यान, रस्ते आणि गटारांच्या कामांची पाहणी केली. उद्यानातील पदपथ, स्वच्छतागृहाचे दरवाजे व इतर दुरुस्ती, नवीन पनवेल सेक्टर ११ मधील रस्ते आणि गटारांची दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. या वेळी कविता चौतमोल, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे आदी उपस्थित होते.

Web Title: Review of monsoon works by the CIDCO president at Panvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको