नवी मुंबई, पनवेलसह उरणमध्ये विद्यार्थ्यांनी साजरा केला जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 02:40 AM2019-06-09T02:40:42+5:302019-06-09T02:40:55+5:30

पेढे वाटून आनंद साजरा। समाजमाध्यमांवरही शुभेच्छांचा वर्षाव

Navi Mumbai, Panvel and Uran celebrate the celebration of the students | नवी मुंबई, पनवेलसह उरणमध्ये विद्यार्थ्यांनी साजरा केला जल्लोष

नवी मुंबई, पनवेलसह उरणमध्ये विद्यार्थ्यांनी साजरा केला जल्लोष

Next

योगेश पिंगळे

नवी मुंबई : दहावीचा निकाल जाहीर होताच नवी मुंबई, पनवेल, उरण परिसरामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते. उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी शाळा व सोसायटी परिसरात एकत्र येऊन आनंद साजरा केला. विद्यार्थी व पालकांनी पेढे व मिठाई वाटून जल्लोष केला. समाजमाध्यमांवरही शुभेच्छांचा वर्षाव सुरू होता.

शासनाने गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याचे बंद केल्यापासून माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागीय बोर्ड परिसरातील गर्दी कमी झाली आहे; परंतु शाळांमध्ये व्यवस्थापन व शिक्षकांना मात्र दहावीच्या निकालाची उत्सुकता असल्याचे दहावीच्या निकालादरम्यानही पाहावयास मिळाले. शिक्षक विशेष प्रावीण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना फोन करून शुभेच्छा देत होते.
विद्याभवन शाळेची परंपरा कायम
नेरु ळमधील पुणे विद्यार्थिगृहाचे विद्याभवन संकुल शाळेचा निकाल १०० टक्के लागला असून, शाळेने १६ वर्षे १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली आहे. यावर्षी सेमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यमात मुलींनी बाजी मारली आहे. शाळेच्या सेमी इंग्रजी विभागात मधुरा महादेव बिराजदार हिला ९५.२० टक्के, श्रद्धा संतोष सातपुते ९२.६० टक्के, अदिती शहादेव चौधर हिला ९१.२० टक्के गुण मिळाले आहेत, तर इंग्रजी विभागात अपेक्षा दत्तात्रेय औटी ९३.६० टक्के, तन्वी उदय घरत ९१.२० टक्के, श्रेया प्रसंता पाठक ९०.८० टक्के गुण मिळाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य कृ.ना. शिरकांडे, राजेंद्र बोºहाडे, संचालक डॉ. शं. पां. किंजवडेकर, दिनेश मिसाळ, मुख्याध्यापक आत्माराम माने यांनी अभिनंदन केले.

साहिल वेदपाठकला ९८.६० टक्के
वाशी येथील सेंट लॉरेन्स विद्यालयातील साहिल वेदपाठक या विद्यार्थ्यांला ९८.६० टक्के, निखिल पानसरे ९२.०८ टक्के, तनया बोराटे या विद्यार्थिनीला ९२ टक्के गुण मिळाले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

वाशीतील फादर अग्नल शाळेचे सुयश
वाशीतील फादर अग्नल शाळेच्या मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांचा निकाल १०० टक्के लागला असून, इंग्रजी माध्यमात ऊर्जा मर्चंट आणि अंजिका नायर या दोन्ही विद्यार्थ्यांना ९८.४ टक्के, ली शु मा ९७.६ टक्के, प्रणव मगर आणि मधुरा चातुफळे या दोन्ही विद्यार्थ्यांना ९७.२ टक्के गुण मिळाले आहेत, तर मराठी माध्यमाच्या ऊर्वी पाटील ९५.४ टक्के, वेदान्त आव्हाड ९४.८ टक्के आणि साक्षी पाटील हिला ९४.४ टक्के गुण मिळाले आहेत.
सुयश मिळविलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे
शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी कौतुक केले.
 

Web Title: Navi Mumbai, Panvel and Uran celebrate the celebration of the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.