नवी मुंबई विमानतळाचे ६३ टक्के काम पूर्ण, सिडकोचा दावा: पुढच्या वर्षी विमानतळाचे टेकऑफ

By कमलाकर कांबळे | Published: March 25, 2024 08:18 PM2024-03-25T20:18:26+5:302024-03-25T20:18:54+5:30

Navi Mumbai Airport Update: देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळ नवी मुंबईत उभारले जात आहे. ३१ मार्च २०२५ मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले टेकऑफ होईल, असा विश्वास संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार कामाने वेग घेतला असून आतापर्यंत ६३ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा सिडकोने केला आहे.

Navi Mumbai Airport 63 percent complete, CIDCO claims: Airport take-off next year | नवी मुंबई विमानतळाचे ६३ टक्के काम पूर्ण, सिडकोचा दावा: पुढच्या वर्षी विमानतळाचे टेकऑफ

नवी मुंबई विमानतळाचे ६३ टक्के काम पूर्ण, सिडकोचा दावा: पुढच्या वर्षी विमानतळाचे टेकऑफ

- कमलाकर कांबळे 
नवी मुंबई - देशातील पहिले ग्रीनफिल्ड विमानतळनवी मुंबईत उभारले जात आहे. ३१ मार्च २०२५ मध्ये या विमानतळावरून विमानाचे पहिले टेकऑफ होईल, असा विश्वास संबंधित विभागाने व्यक्त केला आहे. त्यानुसार कामाने वेग घेतला असून आतापर्यंत ६३ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा सिडकोने केला आहे. तसेच यावर्षी ऑक्टोबर महिन्यापर्यंत विमानांच्या उड्डाणाची चाचणी घेणे अपेक्षित असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट (एनएमआयएपीए) अदानी समूहाद्वारे रायगड जिल्ह्यातील पनवेलनजीकच्या १६०० हेक्टर जागेवर हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारले जात आहे. यात सिडको ही नोडल एजन्सी म्हणून काम पाहत आहे. या प्रकल्पासाठी १९ हजार ६०० कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. दरम्यान, सध्या पहिल्या दोन टप्प्याच्या कामावर भर दिला जात आहे. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल हे यासाठी आग्रही आहेत. त्यामुळेच व्यवस्थापकीय संचालकपदाचा पदभार स्वीकारताच सर्वप्रथम त्यांनी विमानतळ प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. निर्धारित कालावधीत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत. त्यानुसार एक धापवट्टी आणि टर्मिनल उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. एकूणच प्रकल्पाच्या कामाची गती पाहता यावेळी तरी विमानतळाची डेडलाइन हुकणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पाच टप्प्यात प्रकल्प पूर्ण
हा ग्रीनफिल्ड प्रकल्प पाच टप्प्यात पूर्ण केला जाणार आहे. यातील पहिल्या दोन टप्प्यात वर्षाला दोन कोटी प्रवासी क्षमता असणार आहे. पहिल्या टप्प्याचे ६३ टक्के काम पूर्ण झाल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. प्रकल्पाचे पाच टप्पे पूर्ण झाल्यावर विमानतळाला चार टर्मिनल आणि दोन धावपट्टी असतील. तसेच विमानतळावर उत्तम दर्जाची रस्ते, रेल्वे, मेट्रो आणि जल कनेक्टिव्हिटीचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Navi Mumbai Airport 63 percent complete, CIDCO claims: Airport take-off next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.