क्लासच्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 01:15 AM2017-08-16T01:15:02+5:302017-08-16T01:15:20+5:30

खासगी शिकवणीच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घणसोली येथे घडली आहे.

Molestation of classmates by class teacher | क्लासच्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

क्लासच्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग

Next

नवी मुंबई : खासगी शिकवणीच्या शिक्षकाने विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घणसोली येथे घडली आहे. या प्रकाराची माहिती पीडित मुलीने घरी दिल्यानंतर पालकांच्या तक्रारीनुसार कोपरखैरणे
पोलिसांनी सदर शिक्षकाला अटक केली आहे. त्याने इतरही अनेक विद्यार्थिनींसोबत लगड करण्याचा प्रयत्न केल्याचा पालकांचा आरोप आहे.
तुषार नवले, असे पोलिसांनी अटक केलेल्या खासगी क्लासच्या शिक्षकाचे नाव आहे. त्याचा घणसोली सेक्टर-५ येथे मुक्ता खासगी शिकवणीचा क्लास आहे. त्या ठिकाणी परिसरातीलच एक दहावीची विद्यार्थिनी शिकवणीसाठी येत होती. त्याने सदर मुलीसोबत यापूर्वीही अनेकदा लगड करण्याचा प्रयत्न केला होता.
अखेर शुक्रवारी संध्याकाळी क्लासमध्ये गेली असता, नवले याने ती एकटी असल्याची संधी साधून तिच्यासोबत अश्लील कृत्य केले. यानंतर ती क्लासला गेलेली नव्हती. त्यामुळे सोमवारी नवले याने सदर विद्यार्थिनीला फोन करून, ‘क्लासला कधी येणार?’ असे विचारले असता, ती रडू लागली.
याबाबत घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिने संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानुसार तिच्या नातेवाइकांनी नवले याच्याविरोधात कोपरखैरणे पोलिसांकडे तक्रार केली
असता, पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
दरम्यान, त्याने इतरही काही विद्यार्थिनींसोबतही यापूर्वीही लगड करण्याचा प्रयत्न केला असल्याचे पालकांचे म्हणने आहे. याप्रकरणी कोपरखैरणे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title: Molestation of classmates by class teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.