एपीएमसीत कामगारांसाठी विश्रांती कक्षांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 11:55 PM2019-03-28T23:55:49+5:302019-03-28T23:56:40+5:30

तीव्र उकाड्याचा सर्वाधिक त्रास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगारांना होऊ लागला आहे. एक आठवड्यापासून उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत.

 Lack of rest rooms for APMC workers | एपीएमसीत कामगारांसाठी विश्रांती कक्षांची कमतरता

एपीएमसीत कामगारांसाठी विश्रांती कक्षांची कमतरता

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : तीव्र उकाड्याचा सर्वाधिक त्रास मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगारांना होऊ लागला आहे. एक आठवड्यापासून उन्हाच्या झळा असह्य होऊ लागल्या आहेत. पुरेसे विश्रांती कक्ष नसल्यामुळे जागा मिळेल तेथे कामगार विसावा घेताना दिसत असून, एपीएमसी आवारांमधील पाणपोर्इंमधील कुलरही बंद आहेत.
नवी मुंबईचे तापमान ४१ अंशावर पोहचले असून वाढत्या गरमीमुळे शहरवासी त्रस्त झाले आहेत. बाजार समितीमध्ये गोणी वाहण्याचे काम करणाऱ्या माथाडी कामगारांनाही याची झळ बसत आहे. पाच मार्केटमध्ये २५ हजारपेक्षा जास्त कामगार काम करत आहेत. उकाड्यामुळे दिवसभर घामाच्या धारा सुरू आहेत. कामगारांना ठरावीक वेळेनंतर विश्रांती घ्यावी लागत आहे. गाळ्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गोडाऊनमध्ये क्षणभर विश्रांती घेता येते. पण गाळ्यांच्या बाहेर काम करणाºयांसाठी निवारा शेडही नाहीत. फळ मार्केटमधून २०० पेक्षा जास्त पाटीवाला कामगार आहेत. ५० किलोपेक्षा जास्त वजन घेऊन हे कामगार मार्केट ते सानपाडा स्थानक व तेथून मुंबईमधील विविध ठिकाणी जातात. तापमानवाढीमुळे या सर्वांना काम करणे अशक्य होऊ लागले आहे. कामगारांसाठी विश्रांती कक्षच नसल्याने जागा मिळेल तिथे कामगार बसलेले दिसतात. हातगाडी ओढणाºया कामगारांची अवस्थाही सारखीच असून आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. वारणार कामगार वगळता इतरांच्या विश्रांतीसाठी पुरेशी जागा नाही. यामुळे कांदा, फळ मार्केटमध्ये गाळ्यातील गोडाऊनसह लिलावगृहामध्ये आश्रय घ्यावा लागत आहे.
बाजार समितीमध्ये कामगार व इतरांच्या सुविधेसाठी प्रत्येक मार्केटमध्ये पाणपोई उभारल्या आहेत. पाणपोईमध्ये कुलर बसविले आहेत; पण बहुतांश कुलर बंद आहेत. यामुळे सकाळी ११ नंतर पाणपोईमधील पाणीही गरम होत असून त्याचा पिण्यासाठी वापर करता येत नाही. कांदा व फळ मार्केटमधील पाणपोईच्या परिसराची स्वच्छता होत नाही. मसाला मार्केटच्या पाणपोईमधील पाणी दुपारनंतर संपत असल्यामुळे कामगार व इतर नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे.

काम करण्याला पर्याय नाही
मार्केटमधील पाटीवाला कामगारांशी संवाद साधला असता त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, तापमान वाढल्यामुळे ओझे घेऊन जाताना खूप त्रास होत आहे; परंतु उत्पन्नाचे दुसरे साधन नसल्यामुळे हे काम केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मार्केटमध्ये निवाºयासाठी थोडी जागा मिळावी व इतर गैरसोयी दूर व्हाव्या अशी अपेक्षाही अनेक कामगारांनी व्यक्त केली.

प्रत्येक मार्केटमध्ये पाणपोई उभारण्यात आल्या आहेत. त्यांची देखभाल केली जात असते. कुलर बंद असल्यास किंवा इतर काही समस्या असल्यास माहिती घेऊन योग्य कार्यवाही केली जाईल.
- व्ही. बी. बिरादार,
अधीक्षक अभियंता, एपीएमसी

मार्केटमध्ये सर्व घटकांसाठी आवश्यक सुविधा दिल्या जातात. गरमीमुळे कामगार किंवा इतरांना काही समस्यांना सामोरे जावे लागत असल्यास त्याची माहिती घेण्यात येईल. पाणपोर्इंपासून सर्व सुविधांचा आढावा घेऊन योग्य उपाययोजना केल्या जातील.
- अनिल चव्हाण, सचिव, एपीएमसी

Web Title:  Lack of rest rooms for APMC workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.