प्रदूषणमुक्त शहरासाठी पर्यावरणशील ई-बाइक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 02:48 AM2019-07-05T02:48:08+5:302019-07-05T02:49:01+5:30

ई-बाइकसाठी बाइक सुरू करताना १0 रुपये व पुढील प्रत्येक १0 मिनिटासाठी १0 रु पये असा दर असणार आहे.

 Environmental e-bike for a polluted city | प्रदूषणमुक्त शहरासाठी पर्यावरणशील ई-बाइक

प्रदूषणमुक्त शहरासाठी पर्यावरणशील ई-बाइक

googlenewsNext

नवी मुंबई : स्वच्छ शहराप्रमाणेच प्रदूषणमुक्त शहर ही नवी मुंबई शहराची ओळख निर्माण व्हावी यासाठी जनसायकल सहभाग प्रणाली ही संकल्पना सुरू करण्यात आली होती. या प्रणालीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने आता पर्यावरणपूरक ई-बाइक प्रणाली देखील सुरू करण्यात आली आहे. ई-बाइक हा उपक्र म संपूर्ण राज्यात राबविणारी नवी मुंबई ही पहिली महापालिका असून गुरुवारी या प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला.
नवी मुंबई शहर प्रदूषणमुक्त व पर्यावरणशील राहण्यासाठी कमी अंतरावर जाण्याकरिता इंधनयुक्त वाहन न वापरता नागरिकांनी इंधनमुक्त सायकल अथवा ई-बाइकचा वापर करावा यासाठी महापालिकेच्या माध्यमातून जनसायकल प्रणालीनंतर ई-बाइक प्रणाली योजना राबविण्यात येत आहे. इको सिटी असणारी नवी मुंबई आता पर्यावरणशील सायकल सिटी व्हावी ही भूमिका नजरेसमोर ठेवून जन सायकल सहभाग प्रणाली व इलेक्ट्रीकल बाइक सुविधा नवी मुंबई महापालिका क्षेत्रात राबविण्यात येत असून बेलापूर, नेरु ळ, वाशी, तुर्भे विभागातील १४0 हून अधिक सायकल स्टेशन्समध्ये वाढ करीत आता कोपरखैरणे विभागात १0 व ऐरोली विभागात २0 अशी नवीन सायकल स्टेशन टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येत आहेत. ई-बाइकसाठी बाइक सुरू करताना १0 रु पये व पुढील प्रत्येक १0 मिनिटासाठी १0 रु पये असा दर असणार आहे.
या प्रणालीचा वापर अत्यंत सोपा असून याकरिता नागरिकांनी आपल्या स्मार्टफोनवर युलू हे मोबाइल अ‍ॅप डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. या मोबाइल अ‍ॅपवरून नागरिक युलू सायकल अथवा युलू ई-बाइकवर असलेला कोड स्कॅन करून सायकल व ई-बाइक वापरास उपलब्ध करून घेऊ शकतात. सायकल व ई-बाइक घेण्याकरिता आणि ठेवण्याकरिता सायकल स्टेशन ठरविण्यात आलेली आहेत. या योजनेचा शुभारंभ महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी आमदार संदीप नाईक, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृह नेते रवींद्र इथापे आदी मान्यवर नगरसेवक महापालिका अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सायकलिंगमुळे शहरातील प्रदूषणाला आळा बसेल व आरोग्यही चांगले राहील याची जाणीव शहरातील नागरिकांना असल्यामुळे सायकल सहभाग प्रणालीचा ८ महिन्यात ७२ हजार इतका मोठ्या प्रमाणात वापर झाला असून त्यामध्ये ४0 टक्के महिलांनी ही प्रणाली वापरली आहे. आतापर्यंत १0 लाख किलोमीटर इतके अंतर नागरिकांनी सायकल चालविली आहे. त्यामुळे देशातील कोणत्याही शहरापेक्षा नवी मुंबईमध्ये ही योजना नागरिकांमुळे यशस्वी झाली आहे.
-डॉ. रामास्वामी एन.,
महापालिका आयुक्त

सायकलसारख्या प्रदूषण विरहित वाहनाला प्रोत्साहन देण्याची जनसायकल सहभाग प्रणालीची संकल्पना आठ महिन्यात नागरिकांच्या उत्साही प्रतिसादामुळे अत्यंत यशस्वी ठरली असून सायकलिंग नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनेही लाभदायी आहे. नागरिकांनी कमी अंतरावर ये-जा करण्याकरिता इंधनयुक्त वाहन न वापरता इंधनमुक्त सायकल अथवा ई-बाइकचा वापर करावा.
-जयवंत सुतार,
महापौर

Web Title:  Environmental e-bike for a polluted city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.