विकासकांना प्रतीक्षा ग्राहकांची; घर खरेदीवर आकर्षक सवलत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 02:44 AM2018-03-18T02:44:13+5:302018-03-18T02:44:13+5:30

नोटाबंदी, जीएसटी आणि मोकळ्या भूखंडांच्या वाढलेल्या किमती पाहता बजेटमधील घरांच्या निर्मितीला खीळ बसली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची परवड सुरू आहे. असे असले तरी विकासकांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्याचा संकल्प केला आहे.

 Developers waiting for customers; Charming discount on home purchase | विकासकांना प्रतीक्षा ग्राहकांची; घर खरेदीवर आकर्षक सवलत

विकासकांना प्रतीक्षा ग्राहकांची; घर खरेदीवर आकर्षक सवलत

Next

नवी मुंबई : नोटाबंदी, जीएसटी आणि मोकळ्या भूखंडांच्या वाढलेल्या किमती पाहता बजेटमधील घरांच्या निर्मितीला खीळ बसली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची परवड सुरू आहे. असे असले तरी विकासकांनी गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार उपलब्ध असलेल्या सदनिका विक्रीसाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. काही विकासकांनी गुढीपाडव्याला घराची नोंदणी करणाऱ्या ग्राहकांना आकर्षक गिफ्ट देऊ केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोव्हेंबर २0१६ मध्ये नोटाबंदीचा निर्णय घेऊन या क्षेत्रातील अनिर्बंध व बेहिशोबी व्यवहाराला चाप लावला आहे. त्यानंतर लगेच जीएसटी व महारेरा कायदा कार्यान्वित केल्याने मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार ठप्प पडले आहेत. मालमत्ता विकल्या न गेल्याने बिल्डर्स आणि गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीत गुढीपाडव्याचा मुहूर्त काही प्रमाणात का होईना तारून नेईल, असा विश्वास विकासकांना वाटतो आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. काहींनी तर घरखरेदीवर चक्क डिस्काऊंट देऊ केले आहेत, तर अनेकांनी आपल्या नवीन गृहप्रकल्पातील घरखरेदीवर आकर्षक सवलती जाहीर केल्या आहेत.

रेडीरेकनरमध्ये वाढ न करण्याची मागणी
नियमानुसार १ एप्रिलपासून रेडीरेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घरांच्या किमती आणखी भडकणार आहेत. त्यामुळे रियल इस्टेट क्षेत्राची सध्याची परिस्थिती लक्षात घेवून यावर्षी रेडीरेकनरच्या दरात वाढ करू नये, अशी मागणी क्रेडाई-एमसीएचआयने राज्य सरकारकडे केली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी विकासकाच्या विनंतीवरून राज्य सरकारने रेडीरेकनरच्या दरात कोणतीही वाढ केली नव्हती. परंतु यावेळी ही वाढ अटळ मानली जात आहे. त्यामुळे घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बजेटमधील घरांसाठी आजही मोठी मागणी आहे. परंतु भूखंड उपलब्ध नसल्याने स्वस्त घरांच्या निर्मितीला खो बसला आहे. सध्याच्या स्थितीत नैना क्षेत्रातच बजेटमधील घरे निर्मितीला वाव आहे. परंतु सिडकोच्या उदासीन धोरणामुळे ही प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांवर या गुढीपाडव्यालाही निराशा पत्करावी लागणार, हे निश्चित आहे.
- प्रकाश बाविस्कर,
अध्यक्ष, क्रेडाई-
एमसीएचआय, नवी मुंबई

Web Title:  Developers waiting for customers; Charming discount on home purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.