नवी मुंबईत ७०४ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:36 AM2018-07-23T03:36:44+5:302018-07-23T03:37:04+5:30

व्यापाऱ्यांकडून ५ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल

704 kg plastic bags seized in Navi Mumbai | नवी मुंबईत ७०४ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

नवी मुंबईत ७०४ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त

Next

नवी मुंबई : महानगरपालिकेने प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करणाºयांविरोधात मोहीम तीव्र केली आहे. आठ विभाग कार्यालय क्षेत्रामधून तब्बल ७०४ किलो प्लॅस्टिक जप्त केले असून, व्यापारी व पिशव्यांचा वापर करणाºयांकडून ५ लाख ३५ हजार रुपये दंड वसूल केला आहे.
महानगरपालिकेने आठही विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये विशेष मोहीम राबविली आहे. पातळ पिशव्यांच्या सामान विक्र ीची दुकाने, मार्केट, बाजार या ठिकाणी राबविण्यात आली. मटण, चिकन नेण्यासाठी नागरिकांकडून काळ्या पिशव्यांचा वापर केला जात असून, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. यामध्ये बेलापूर विभागात ४४ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या, तसेच ८ दुकानांवर दंडात्मक कारवाई करीत ४५ हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. नेरूळ विभागात ८0 किलो प्लॅस्टिक पिशव्यांची जप्ती, तसेच ३ दुकानांतून १५ हजार दंड रक्कम वसूल करण्यात आली. वाशी विभागात १३५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त, तसेच ४ दुकानांतून २0 हजार दंडवसुली करण्यात आली. तुर्भे विभागात ११0 किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्ती आणि ११ दुकानांतून ५५ हजार दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली. कोपरखैरणे विभागामध्ये १४ दुकानांतून ७0 हजार दंडवसुली आणि १६.५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. घणसोली विभागातील ३६ दुकानांतून १ लाख ३५ हजार रकमेची दंडात्मक वसुली, तसेच २५0 किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. ऐरोली विभागातील २४ दुकानांतून १ लाख २0 हजार दंड वसूल करण्यात आला, तसेच ४३.५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या. त्याचप्रमाणे दिघा विभाग क्षेत्रात १७ दुकानांतून २५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्ती आणि २५ हजार रक्कम दंडवसुली करण्यात आली. जप्त करण्यात आलेले प्लॅस्टिक नवी मुंबई महानगरपालिकेच्या तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी नेऊन त्यापासून प्लॅस्टिक ग्रॅन्युल्स तयार करून त्याचा उपयोग डांबरी रस्ते तयार करताना सरफेस कोटिंगसाठी करण्यात येणार आहे.

महापौरांसह आयुक्तांचे आवाहन
महाराष्ट्र शासनाने जारी केलेली प्लॅस्टिकबंदी व महानगरपालिका त्यादृष्टीने करीत असलेली प्रतिबंधात्मक कारवाई प्लॅस्टिक हे पर्यावरणाला व मानवासह सर्वच प्राणीजीवनाला घातक असल्याने करण्यात येत असल्याचे लक्षात घ्यावे व सर्व नागरिकांनी आपल्याच हिताकरिता सुरू असलेल्या या मोहिमेला प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर थांबवून संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार तसेच महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी केले आहे.

पनवेलमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरूच
राज्यभर लागू झालेल्या प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला केराची टोपली दाखवत अजूनही अनेक ठिकाणी पनवेलमध्ये प्लॅस्टिक पिशव्यांचा सर्रास वापर सुरू असल्याचे दिसत आहे. मात्र महापालिकेच्या या कारवाईची तमा न बाळगता पनवेल शहरातील आणि परिसरातील खाद्यपदार्थ विक्रे त्यांकडून प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर होताना दिसत आहे.

Web Title: 704 kg plastic bags seized in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.