भोपाळ वायूकांडातील आरोपी वॉरन अँडरसन याचे निधन

By admin | Published: November 1, 2014 01:53 AM2014-11-01T01:53:45+5:302014-11-01T01:53:45+5:30

3 हजार लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या भोपाळ वायू कांडाप्रकरणी भारताला हवा असलेला युनियन कार्बाईड कंपनीचा माजी प्रमुख वॉरन अँडरसन याचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.

Warren Anderson dies in Bhopal Vayukanda | भोपाळ वायूकांडातील आरोपी वॉरन अँडरसन याचे निधन

भोपाळ वायूकांडातील आरोपी वॉरन अँडरसन याचे निधन

Next
न्यूयॉर्क : 3 हजार लोकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या भोपाळ वायू कांडाप्रकरणी भारताला हवा असलेला युनियन कार्बाईड कंपनीचा माजी प्रमुख वॉरन अँडरसन याचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. 29 सप्टेंबर रोजी फ्लोरिडा येथील वेरो बीचवरील एका रुग्णालयात त्याचे निधन झाले. 
त्याच्या कुटुंबियांनी मृत्यूची घोषणा केली नाही; पण सार्वजनिक रेकॉर्डवरून त्याच्या निधनाची खात्री करून घेतल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. भोपाळ वायू कांड हा उद्योग क्षेत्रतील सर्वात दुर्दैवी असा अपघात मानला जातो. 
भारत सरकारने अँडरसनचे प्रत्यार्पण करण्याची विनंती अनेकवार अमेरिकेला केली होती, तसेच त्याने पलायन केल्याचे जाहीरही करण्यात आले होते. एका न्यायाधीशांनी तो  फरार असल्याचेही म्हटले होते. भोपाळ वायू कांडाचा दुर्दैवी अपघात झाल्यानंतर चार दिवसांनी अँडरसन भोपाळ येथे पोहोचला होता. तात्काळ त्याला अटकही झाली होती; पण जामिनावर तो लगेच सुटला व परत कधीही खटल्यासाठी भारतात आला नाही. 2-3 डिसेंबर 1984 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास भोपाळ येथील युनियन कार्बाईड या कीटकनाशके बनविणा:या कारखान्यातून रासायनिक प्रतिक्रियेमुळे विषारी वायू तयार झाले व ते आजूबाजूच्या परिसरात पसरले, यामुळे हजारो लोक जागीच मरण पावले. 
मध्यप्रदेश सरकारने मृतांचा आकडा 3,787  झाल्याचे जाहीर केले; पण अनधिकृत अंदाजानुसार मृतांचा आकडा 1क्,क्क्क् पेक्षा जास्त होता. 5 लाख लोक या अपघातात जखमी झाले. फुफ्फुसाचा कर्करोग, मूत्रपिंड बंद पडणो, यकृताच्या आजाराने अनेक जण मरण पावले. या दुर्दैवी अपघातातील मृतांचे नातेवाईक व जखमी यांच्यासाठी युनियन कार्बाईडने 1989 साली 47क् दशलक्ष डॉलर नुकसानभरपाई दिली; पण अमेरिकन सरकारच्या मदतीने अँडरसनने प्रत्यार्पण टाळले. भोपाळ वायू कांडासंदर्भातील खटलेही त्याने टाळले, वेरो बीच, कनेक्टिकट व ब्रीजहॅम्पटन येथील घरात तो शांततेने राहिला, असे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे. 
 
अजरुनसिंग यांच्या फोनमुळे पलायन यशस्वी, 3क् वर्षे फरार
भोपाळ : भोपाळ येथील कारखान्यातून झालेल्या विषारी वायुच्या गळतीने 15 हजारांहून अधिक व्यक्तींच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या युनियन कार्बाईड या अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष वॉरेन अॅण्डरसन याचे भारतीय न्यायसंस्थेच्या दृष्टीने 3क् वर्षे फरार असलेला आरोपी म्हणून अलीकडेच फ्लोरिडा येथे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले. पण मध्य प्रदेशचे तत्कालिन मुख्यमंत्री अजरुन सिंग यांनी केलेल्या फोनमुळे अॅण्डरसन यांना त्यावेळी भारतातून पळून जाणो शक्य झाले नसते तर कदाचित त्याने भारतीय तुरुंगातच अखेरचा श्वास घेतला असता.
जगातील सर्वात भीषण औद्योगिक अपघात म्हणून ओळखली जाणारी भोपाळ वायूगळती दुर्घटना घडल्यानंतर पाच दिवसांनी म्हणजे 7 डिसेंबर 1984 रोजी अॅण्डरसन भोपाळमध्ये आला. खरे तर भारतात आले तरी तुरुंगात डांबणार नाही असे अलिखित आश्वासन मिळाले म्हणून तर अॅण्डरसन भारतात आला होता.
भोपाळमध्ये पोहोचताच पोलिसांनी त्याला युनियन कार्बाईडच्या अतिथीगृहात नेले व नजरकैदेत ठेवले.
भोपाळमध्ये हे घडत असताना मध्य प्रदेशचे त्यावेळचे मुख्यमंत्री अजरुन सिंग ग्रामीण भागात निवडणूक प्रचारसभा घेत होते. तेथे त्यांना दिल्लीहून कोणाचा तरी फोन आला. त्यानुसार त्यांनी भोपाळला फोन करून अधिका:यांना सूचना दिल्या. त्यानंतर थोडय़ाच वेळात अॅण्डरसन याची 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्यात आली. लगेच त्याला सरकारी विमानाने दिल्लीला नेण्यात आले व तेथून तो जो अमेरिकेला रवाना झाले तो खटल्याला सामोरे जाण्यासाठी पुन्हा कधी भारतात आलाच नाही. खरे तर न्यायालयास हवे असेल तेव्हा हजर राहण्याची हमी त्याला सुटकेच्या वेळी जातमुचलक्यात दिली होती.  (वृत्तसंस्था)
 
4अॅण्डरसन यांना पलायन करण्यास साह्यभूत ठरलेला तो फोन अजरुन सिंग यांनी कोणाच्या सांगण्यावरून केला होता, याविषयी अजूनही संभ्रम आहे. याचे निश्चित उत्तर फक्त अजरुन सिंग हेच देऊ शकतात. पण ते आज हयात नाहीत. त्यांनी ‘ए ग्रेन ऑफ सॅण्ड इन अवरग्लास ऑफ टाइम’ या आपल्या आत्मचरित्रत अजरुन सिंग यांनी याचे उत्तर दिलेही. पण त्याच्या सचोटीविषयी शंका आहे. 
 
4त्यावेळचे केंद्रीय गृहसचिव राम प्रधान यांनी तत्कालीन गृहमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांच्या सांगण्यावरून आपल्याला फोन केला होता व त्यानुसार अॅण्डरसन यांची सुटका करण्यात आली, असे अजरुन सिंग यांनी आत्मचरित्रत लिहिले होते; परंतु हे आत्मचरित्र प्रकाशित होताच राम प्रधान यांनी याचा ठामपणो इन्कार केला होता. अॅण्डरसन यांची सुटका झाली तेव्हा मी महाराष्ट्राचा मुख्य सचिव होतो व भोपाळ वायू दुर्घटनेनंतर एक वर्षाने मी केंद्रीय गृहसचिव झालो. त्यामुळे मी अजरुन सिंग यांना फोन करण्याचा प्रश्नच येत नाही, असे राम प्रधान यांनी त्यावेळी सांगितले होते

 

Web Title: Warren Anderson dies in Bhopal Vayukanda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.