Video: काय बघावे लागतेय! धाकट्या दीरासोबत लग्नासाठी दोन वहिन्यांमध्ये राडा; अख्खा गाव जमा झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 10:32 AM2023-10-21T10:32:30+5:302023-10-21T10:32:53+5:30

धाकट्या दीरावर दोन वहिन्या फिदा होत्या. एक त्याच्याशी लग्न करायला गेली तर दुसरी माहेरच्यांना घेऊन हजर झाली. मग काय... पहा व्हिडीओ...

Video: What to see! clash between the two sisters-in-law to marry the younger devar; The whole village gathered bihar viral video | Video: काय बघावे लागतेय! धाकट्या दीरासोबत लग्नासाठी दोन वहिन्यांमध्ये राडा; अख्खा गाव जमा झाला

Video: काय बघावे लागतेय! धाकट्या दीरासोबत लग्नासाठी दोन वहिन्यांमध्ये राडा; अख्खा गाव जमा झाला

बिहारच्या नालंदा जिल्ह्यात दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा झाल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या दोन महिलाच नाही तर त्यांची माहेरची मंडळीदेखील एकमेकांना भिडल्याचे या व्हिडीओत दिसत आहे. हा तमाशा पाहण्यासाठी शे-दोनशे गाववालेदेखील जमा झाले होते. 

या लोकांसमोरच या दोन गटांमध्ये जोरदार लाथाबुक्क्या झाल्या. काही लोकांनी त्यांना शांत करण्याचाही प्रयत्न केला. हा प्रकार समजताच पोलीस घटनास्थळी आले आणि एका महिलेला तिचा पती आणि मुलांसोबत पोलीस ठाण्यात घेऊन गेले. 

हे प्रकरण काय...
मलामा गावातील महेंद्र पासवान यांना तीन मुलगे आहेत. सुबोध कुमार, मॅनेजर पासवान आणि हिरेंद्र. यापैकी मॅनेजर पासवानचा मृत्यू झाला आहे. तर मोठा मुलगा सुबोध कुमार जिवंत आहे. धाकटा मुलगा हिरेंद्र याचे अद्याप लग्न झालेले नाहीय. मॅनेजरच्या विधवा पत्नीला हिरेंद्रसोबत लग्न करायचे होते. तिला तीन मुलेही आहेत. माहेरच्या लोकांनी हिरेंद्रसोबत लग्न ठरवून ते करण्यासाठी हिलसाचे सरकारी कार्यालय गाठले होते. 

परंतू, हिरेंद्रवर त्याची मोठी वहिनी देखील फिदा होती. तिला देखील हिरेंद्रसोबत लग्न करायचे होते. यावरून दोन्ही वहिन्या एकमेकींना भिडल्या, यात कमी की काय म्हणून दोघींचेही माहेरचे लोक देखील एकमेकांना मारहाण करू लागले. यानंतर पोलिसांनी सुबोध कुमार व त्याच्या पत्नीला पोलीस ठाण्यात नेले तेव्हाकुठे हिरेंद्र आणि त्याची विधवा वहिनी हेमंतीदेवी यांचे लग्न लागले. या साऱ्या लव्ह ट्रँगलमध्ये गावकऱ्यांचे मात्र चांगलेच मनोरंजन झाले. 

Web Title: Video: What to see! clash between the two sisters-in-law to marry the younger devar; The whole village gathered bihar viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.