Video - "तिरंग्यापासून दूर राहण्याची यांची जुनी सवय"; जय शाह यांना काँग्रेसचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 02:00 PM2022-08-29T14:00:37+5:302022-08-29T14:01:02+5:30

Jai Shah Video : भारताच्या विजयानंतर जय शाह त्यांच्या शेजारी असलेल्या व्यक्तीने त्यांना तिरंगा देऊ केला, परंतु जय शाह यांनी नकार दिला.

Video Jairam Ramesh targets Amit Shahm Son Jai Shah | Video - "तिरंग्यापासून दूर राहण्याची यांची जुनी सवय"; जय शाह यांना काँग्रेसचा टोला

Video - "तिरंग्यापासून दूर राहण्याची यांची जुनी सवय"; जय शाह यांना काँग्रेसचा टोला

googlenewsNext

आशिया चषक स्पर्धेत ( Asia Cup 2022)  भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर रोमहर्षक विजयाची नोंद केली. हार्दिक पांड्या, विराट कोहली, रवींद्र् जडेजा, भुवनेश्वर कुमार अगदी नव्याने दाखल झालेल्या अर्षदीप सिंग यानेही उल्लेखनीय कामगिरी करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताच्या या विजयाचे देशात सेलिब्रेशन करण्यात आले. दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर भारताचा गजर घुमला... पण, BCCI सचिव जय शाह (Jay Shah) यांची एक कृती चर्चेचा विषय ठरली आहे. यावरून काँग्रेसने निशाणा साधला आहे. 

हार्दिकने विजयी षटकार खेचल्यानंतर स्टेडियमवर एकच जल्लोष झालेला पाहायला मिळाला. गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र जय शाह हे आशियाई क्रिकेट संघटनेचे अध्यक्षही आहेत. तेही हा सामना पाहण्यासाठी उपस्थित होते आणि भारताच्या विजयानंतर ते पेव्हेलियनमध्ये उभे राहून टाळ्या वाजवू लागले. अशात त्यांच्या शेजारी असलेल्या व्यक्तीने त्यांना तिरंगा देऊ केला, परंतु जय शाह यांनी नकार दिला. आता विरोधकांनी हाच व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करून टीकेला सुरुवात केली आहे. नेटीझन्सनीही ट्रोलिंग सुरू केले.  

"मेरे पास पापा हैं, तिरंगा अपने पास रखो!"

काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून व्हिडीओ शेअर करत ट्विट केलं आहे. "मेरे पास पापा हैं, तिरंगा अपने पास रखो!" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच काँग्रेसने जय शाह यांना लक्ष्य केलं आहे. "तिरंग्यापासून दूर राहण्याची यांची जुनी सवय आहे" असा टोला लगावला आहे. तेलंगणा राष्ट्र समितीनेही ट्विटरवरुन नाराजी व्यक्त केली आहे. "हे कृत्य बिगर भाजपा नेत्याने केलं असतं, तर काय झालं असतं? भाजपाच्या आयटी विंगने त्या व्यक्तीला देशद्रोही म्हटलं असतं" असं ट्वीट टीआरएसचे सोशल मीडिया प्रमुख कृष्णन यांनी केलं आहे. 


 

Web Title: Video Jairam Ramesh targets Amit Shahm Son Jai Shah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.