आश्चर्य! अवघ्या 12 रुपयांत आता विमान प्रवास

By admin | Published: May 23, 2017 05:40 PM2017-05-23T17:40:11+5:302017-05-23T17:45:18+5:30

एअरलाइन्स कंपनीनं पाच दिवसांसाठी एक विशेष ऑफर प्रवाशांसाठी सेवेत आणली आहे.

Surprise! Now, in the next 12 rupees, the plane travels | आश्चर्य! अवघ्या 12 रुपयांत आता विमान प्रवास

आश्चर्य! अवघ्या 12 रुपयांत आता विमान प्रवास

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - उन्हाळ्याच्या दिवसांत तुम्ही सुट्टी व्यतित करण्यासाठी काही बेत आखताय. मात्र अजूनही एअर तिकीट बुक न केल्यास घाबरण्याचं काही कारण नाही. कारण आता तुम्ही फक्त नाममात्र 12 रुपयांमध्ये हवाई प्रवास करू शकता. यासाठी एअरलाइन्स कंपनीनं पाच दिवसांसाठी एक विशेष ऑफर प्रवाशांसाठी सेवेत आणली आहे. तुम्हीही या पाच दिवसांत तिकीट बुक करून उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची मजा लुटू शकता.

लो कॉस्ट एअरलाइन्सच्या स्पाइसजेट या कंपनीनं स्वतःच्या 12व्या वर्षपूर्तीनिमित्त ही ऑफर प्रवाशांना भेट स्वरुपात दिली आहे. या ऑफर अंतर्गत 23 मे ते 28 मे 2017 रोजीपर्यंत तुम्ही तिकीट बुक करू शकता. प्रवासी या दिवसांत केवळ 12 रुपयांत तिकीट बुक करू शकतात. तिकीट बुक केल्यामुळे प्रवासी 26 जून ते 24 मार्च 2018पर्यंत प्रवास करू शकतात. मात्र यासाठी प्रवाशांना एअरपोर्ट टॅक्स आणि इतर सरचार्ज वेगळे द्यावे लागणार आहेत.

कंपनीकडे या ऑफरसाठी मर्यादित तिकिटं उपलब्ध आहेत. या ऑफरनंतर एक लकी ड्रॉसुद्धा काढण्यात येणार आहे. त्याअंतर्गत प्रवाशांना मोफत आंतरराष्ट्रीय तिकिटं जिंकण्याची संधी मिळणार आहे. तसेच कोणत्याही हॉटेलमध्ये थांबण्यासाठी 10 हजार रुपयांचं गिफ्ट वाऊचरही कंपनीकडून देण्यात येणार आहे.

Web Title: Surprise! Now, in the next 12 rupees, the plane travels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.