जी-सॅट-१६ चे यशस्वी प्रक्षेपण

By admin | Published: December 8, 2014 01:58 AM2014-12-08T01:58:56+5:302014-12-08T01:58:56+5:30

दळणवळण सेवांमध्ये भर टाकण्यासोबतच देशाच्या अंतराळ क्षमतावाढीच्या दृष्टीने भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे़ फ्रेंच गुयानाच्या कोरू प्रक्षेपण तळावरून रविवारी पहाटे

Successful launch of G-Sat-16 | जी-सॅट-१६ चे यशस्वी प्रक्षेपण

जी-सॅट-१६ चे यशस्वी प्रक्षेपण

Next

बंगळुरू: दळणवळण सेवांमध्ये भर टाकण्यासोबतच देशाच्या अंतराळ क्षमतावाढीच्या दृष्टीने भारताने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे़ फ्रेंच गुयानाच्या कोरू प्रक्षेपण तळावरून रविवारी पहाटे भारताच्या जीसॅट-१६ या दळणवळण उपग्रहाचे अंतराळात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले़
खराब हवामानामुळे गत दोन दिवसांपासून या उपग्रहाचे प्रक्षेपण रखडले होते़ रविवारी पहाटे २ वाजून १० मिनिटाला एरिएन-५ व्हीए २२१ या यानामार्फत या उपग्रहाने जीओसिंक्रोनस ट्रान्सफर आॅर्बिट (जीटीओ)मध्ये प्रवेश केला़ एरियन श्रेणींच्या प्रक्षेपकाद्वारे केलेले हे २२१ वे प्रक्षेपण आहे़ जीसॅट-१६ वर दळणवळणासाठी ४८ ट्रान्सपाँडर आहेत़ भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोद्वारे बनविण्यात आलेल्या आत्तापर्यंतच्या सर्व दळवळण उपग्रहांवर लावण्यात आलेल्या ट्रान्सपाँडरच्या संख्येपेक्षा ही संख्या अधिक आहे़
प्रक्षेपणानंतर काही वेळातच कर्नाटकच्या हासनस्थित इस्रोच्या ‘मास्टर कंट्रोल फॅसिलिटी’ या नियंत्रण केंद्राने जीसॅट-१६ चे नियंत्रण आपल्या ताब्यात घेतले़ प्राथमिक पडताळणीअंती हा उपग्रह सामान्य स्थितीत असल्याचे आढळले आहे़
यानंतर सोमवारी पहाटे ३ वाजून ५० मिनिटाला हा उपग्रह कक्षेत वर उचलण्यात येईल़ उपग्रहाला भूस्थिर कक्षेत ५५ अंश पूर्व रेखांशावर स्थिर करणे आणि जीसॅट-८, आयआरएनएसएस-१ ए आणि आयआरएनएसएस-१ बीसोबत स्थापित करण्याच्या पहिल्या टप्प्यांतर्गत ही प्रक्रिया पार पाडली जाईल़
गत शुक्रवारी जीसॅट-१६ चे प्रक्षेपण होणार होते़ तथापि, कोरू येथील खराब हवामानामुळे याचे प्रक्षेपण काही तासांसाठी पुढे ढकलण्यात आले होते़ कोरू हे भूमध्य रेखेनजीक स्थित असल्यामुळे हे स्थान भूस्थिर कक्षेत स्थापित करण्याच्या मोहिमांसाठी सर्वाधिक उपयुक्त आहे़
जीसॅट-१६ हा एक बहुपयोगी दळणवळण उपग्रह आहे़ संपूर्ण भारतीय उपखंड याच्या कार्यकक्षेत असेल़ एरियनस्पेसद्वारे प्रक्षेपित हा इस्रोचा १८ वा उपग्रह आहे़
लाँग मार्चच्या मदतीने चीनी उपग्रह प्रक्षेपित
बीजिंग : चीनच्या जुन्या ‘लाँग मार्च’ श्रेणीतील रॉकेटच्या अद्ययावत आवृत्तीच्या माध्यमातून एक बहुउद्देशीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. या रॉकेटच्या मदतीने करण्यात आलेले हे २०० वे प्रक्षेपण आहे. ‘लाँग मार्च-४ बी’ रॉकेटच्या मदतीने ‘सीबीईआरएस-४’चे यशस्वीरीत्या प्रक्षेपण करण्यात आले असून ते अवकाश कक्षेत स्थिर झाले आहे. या कार्यक्रमांतर्गत पहिला उपग्रह ‘सीबीईआरएस’ आॅक्टोबर १९९९ मध्ये प्रक्षेपित करण्यात आला होता. यानंतर २००३ दुसऱ्या व २००७ मध्ये तिसऱ्या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. (वृत्तसंस्था)

Web Title: Successful launch of G-Sat-16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.