सौभाग्य योजनेमुळे राज्यात १५.१८ लाख घरांना वीज, ३०५०० पेक्षा जास्त घरे सौरऊर्जेने उजळली

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 11:54 AM2022-02-07T11:54:12+5:302022-02-07T11:57:25+5:30

Saubhagya Yojana : महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडील (मेडा) आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून आर्थिक वर्ष २०२१ अखेरपर्यंत महाराष्ट्रात एकूण ३०,५३८ घरांत ऑफ ग्रीड सोलर लाइट प्रणालीसह एकूण १५.१८ लाख घरांत वीजजोडणी दिली गेली आहे. 

Saubhagya Yojana has provided electricity to 15.18 lakh households in the state | सौभाग्य योजनेमुळे राज्यात १५.१८ लाख घरांना वीज, ३०५०० पेक्षा जास्त घरे सौरऊर्जेने उजळली

सौभाग्य योजनेमुळे राज्यात १५.१८ लाख घरांना वीज, ३०५०० पेक्षा जास्त घरे सौरऊर्जेने उजळली

Next

नितीन अग्रवाल -

नवी दिल्ली
: प्रत्येक घरी वीज पोहोचविण्यासाठी सुरू केल्या गेलेल्या केंद्र सरकारच्या पंतप्रधान सहज बिजली हर घर योजनेतून महाराष्ट्रात १५.१८ लाख कुटुंबांना जोडणी दिली गेली आहे. यातील ३०,५०० पेक्षा जास्त घरे जेथे पारंपरिक वीज पोहोचणे कठीण होते, ती घरे सौरऊर्जेने उजळून निघाली आहेत. 

नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाकडील आकडेवारीनुसार राज्यात सौरऊर्जेने उजळून निघालेल्या घरांत सर्वाधिक २२,६३३ घरे नंदूरबारमध्ये आणि ३,७२१ घरे अमरावतीत आहेत. धुळ्यात १,०६५, गडचिरोलीत ८५५ आणि जलगावात ७०७ घरांपर्यंत सौरऊर्जेने वीज पोहोचविली गेली आहे.

महाराष्ट्र एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीकडील (मेडा) आकडेवारीनुसार ऑक्टोबर २०१७ मध्ये सुरू झालेल्या या योजनेतून आर्थिक वर्ष २०२१ अखेरपर्यंत महाराष्ट्रात एकूण ३०,५३८ घरांत ऑफ ग्रीड सोलर लाइट प्रणालीसह एकूण १५.१८ लाख घरांत वीजजोडणी दिली गेली आहे. 

महाराष्ट्रात सौरऊर्जेने उजळलेली घरे
जिल्हा            जोडणी
नंदूरबार -             २२,६३३
अमरावती -      ३,७२१
धुळे -              १,०६५
गडचिरोली     -        ८५५
जळगाव -        ७०७
अखिल महाराष्ट्र - ३०,५३८
 

Web Title: Saubhagya Yojana has provided electricity to 15.18 lakh households in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.