नॅशनल हेरॉल्डप्रकरणी कारवाई सूडभावनेतून

By admin | Published: July 10, 2014 02:17 AM2014-07-10T02:17:09+5:302014-07-10T02:17:09+5:30

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी आयकर विभागाने बजावलेली नोटीस ही मोदी सरकारने सूडभावनेतून केलेली कारवाई आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे.

Reacting to the National Herald case | नॅशनल हेरॉल्डप्रकरणी कारवाई सूडभावनेतून

नॅशनल हेरॉल्डप्रकरणी कारवाई सूडभावनेतून

Next
नवी दिल्ली : नॅशनल हेरॉल्डप्रकरणी आयकर विभागाने बजावलेली नोटीस ही मोदी सरकारने सूडभावनेतून केलेली कारवाई आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केला आहे. सरकार अशाच प्रकारे काम करीत राहिल्यास काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्यास मदत होईल, असा दावाही त्यांनी केला. नॅशनल हेरॉल्डप्रकरणी कायदेशीर लढाई लढण्याचा विचार काँग्रेस करीत आहे. 
दरम्यान, भाजपाचे नेते आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर यांनी मात्र सोनिया गांधी यांचे आरोप फेटाळताना सूडभावनेतून कारवाई केल्यास काँग्रेसला लपण्याचीही जागा मिळणार नाही, असे म्हटले आहे. 
 राजकीय पक्ष असतानाही काँग्रेसने व्यावसायिक दृष्टिकोनातून काम केले. राजकीय पक्ष असल्याचा फायदा करातून सूट मिळवण्यासाठी घेतला, असे आयकर विभागाने पाठवलेल्या नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. काँग्रेसला करात मिळालेली सवलत परत का घेऊ नये? असा सवालही करण्यात आला आहे. याप्रकरणी दिल्लीतील पतियाळा हाऊस कोर्टाने सोनिया गांधी आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना समन्स बजावून 7 ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. भाजपा नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी या प्रकरणी कोर्टात याचिका दाखल केली होती. काँग्रेसचा निधी खासगी मालमत्तेसाठी उपयोगात आणला गेला. हेरॉल्ड हाऊसच्या 1,6क्क् कोटी रुपयांच्या संपत्तीचा वापर वैयक्तिक फायद्यासाठी केला गेला. ही संपत्ती असोसिएट जर्नल्स लिमिटेड या कंपनीची आहे आणि त्यावर गांधी कुटुंबियांनी गुपचूप ताबा मिळवला, असा आरोप स्वामींनी याचिकेतून केला आहे.  (लोकमत न्यूज नेटवर्क)

 

Web Title: Reacting to the National Herald case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.