जीन्स घालणाऱ्या मुलींना कॉलेज प्रवेशापासून रोखले

By admin | Published: June 29, 2016 06:05 AM2016-06-29T06:05:24+5:302016-06-29T06:05:24+5:30

शिस्तपालन करणाऱ्या मुलींनाच यापुढे प्रवेश मिळेल, असे फर्मान येथील महिला महाविद्यालयाने काढले आहे.

Preventing jealous girls from college admissions | जीन्स घालणाऱ्या मुलींना कॉलेज प्रवेशापासून रोखले

जीन्स घालणाऱ्या मुलींना कॉलेज प्रवेशापासून रोखले

Next

एस.पी. सिन्हा,

पाटणा- शिस्तपालन करणाऱ्या मुलींनाच यापुढे प्रवेश मिळेल, असे फर्मान येथील महिला महाविद्यालयाने काढले आहे. जीन्स-टॉप परिधान केलेल्या मुली मंगळवारी बी.एड.च्या प्रवेशासाठी महाविद्यालयात गेल्या तेव्हा असता, त्यांनां प्रवेशद्वारावरच रोखण्यात आले.
या घटनेने मुलींची घाबरगुंडी उडाली. आम्ही फार दुरून आलो आहोत, आम्हाला आत जाऊ द्या, असे या विद्यार्थिनींनी गार्डला अनेकदा विनवले. परंतु त्याने दाद दिली नाही. त्यामुळे बी.एड. प्रवेशाचे अर्ज घेण्यासाठी जीन्स घालून आलेल्या अनेक मुलींना परतावे लागले. ज्या मुलींनी आज अर्ज भरले नाहीत, त्यांची अ‍ॅडमिशन रद्द करण्यात आलीे.
प्रवेशासाठी निवड झालेल्या अनेक विद्यार्थिनींना त्या सलवारकुर्ता परिधान करून आल्यावरच प्रवेश देण्यात आला. या महाविद्यालयाच्या नियमांनुसार विद्यार्थिनींना सलवार कुर्ता घालून येणे अनिवार्य करण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Preventing jealous girls from college admissions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.