भाजपाची सावध पावले, घाई न करण्याची सूचना; काँग्रेसचे १० आमदार वेगळा गट बनवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2024 08:27 PM2024-01-26T20:27:27+5:302024-01-26T20:59:23+5:30

JDU ची नजर १७ लोकसभेच्या जागा आणि इंडिया आघाडीच्या समन्वयक पदावर होती

Political movement in Bihar will speed up, Nitish Kumar will join BJP, 10 Congress MLAs will form a separate group | भाजपाची सावध पावले, घाई न करण्याची सूचना; काँग्रेसचे १० आमदार वेगळा गट बनवणार?

भाजपाची सावध पावले, घाई न करण्याची सूचना; काँग्रेसचे १० आमदार वेगळा गट बनवणार?

पटणा - बिहारच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. आरजेडी आणि जेडीयू युती तुटण्याच्या मार्गावर असताना नीतीश कुमार पुन्हा एकदा एनडीएमध्ये सामील होऊ शकतात अशी चर्चा आहे. एकीकडे या चर्चांना उधाण आलेले असताना दुसरीकडे काँग्रेसबाबत मोठे दावे केले जात आहेत. काँग्रेसचे अनेक आमदारही भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे बिहारमधील काँग्रेस आमदारांवरही भाजपाची नजर आहे. या स्थितीमुळे राज्यात भाजपा मजबूत होईल असं राजकीय तज्ज्ञांचे मत आहे. 

भाजपाच्या सूत्रांनुसार, काँग्रेसचे १० हून अधिक आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत. भाजपाची नजर बिहारमधील काँग्रेस आमदारांवर आहे आणि दहा आमदार वेगळे होऊन स्वतःचा गट स्थापन करू शकतात. दुसरीकडे, भाजपा आपल्या अटींवर नीतीशकुमार यांच्याशी तडजोड करेल. भाजपा एनडीएच्या सर्व घटक पक्षांची काळजी घेईल. काँग्रेसचे १० आमदार वेगळे झाले तर लालू यादव यांची खेळी बिघडेल. सध्याच्या परिस्थितीत, नीतीश त्यांच्यापासून वेगळे झाले तर बहुमताच्या आकडा गाठण्यासाठी लालू प्रसाद यादवांना ८ आमदारांची गरज आहे. मांझी (४ आमदार), AIMIM (१ आमदार), सुमित सिंग (अपक्ष) यांचा समावेश करून ती ही दरी भरून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे मानले जात होते. पण काँग्रेसच्या एकूण १९ पैकी १० आमदारांनीही वेगळी चूल मांडली तर बहुमताचा १२२ आकडा त्यांच्यापासून दूर होईल. 

पशुपती पारस, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाह आणि जीतन राम मांझी यांना सन्मानजनक स्थान मिळेल. भाजपचाही डोळा लव-कुश मतांवर आहे. नीतीश आणि कुशवाह एकत्र राहिल्यास निवडणुकीत मोठा फायदा होईल असे बोलले जात आहे. २०२५ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आघाडीला मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे. त्याचवेळी एक बातमी अशीही येत आहे की, भाजपा आमदारांनी नीतीश कुमारांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. नीतीश कुमार यांच्या स्वागतासाठी भाजपा आमदार राजू सिंह सज्ज झाले आहेत. त्यांनी नीतीश कुमार यांचे कौतुक केले आहे. भाजपाच्या सर्वोच्च नेतृत्वाने नीतीश कुमारांना मुख्यमंत्री केले तर ते आम्ही स्वीकारू असे त्यांनी म्हटले आहे.

नीतीश कुमार काँग्रेसवर नाराज?

एका इंग्रजी वृत्तवाहिनीने दिलेल्या सूत्रांनुसार, नीतीश कुमार काँग्रेसवर नाराज आहेत. नीतीश कुमार यांना इंडिया आघाडीचे संयोजक पद न देणे हे अपमानास्पद कृत्य होते. जागावाटपाच्या चर्चेला विलंब, समन्वयकपदाचा निर्णय न झाल्याने नीतीश कुमार काँग्रेसवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. JDU ची नजर १७ लोकसभेच्या जागा आणि इंडिया आघाडीच्या समन्वयक पदावर होती. त्याचवेळी भाजपाने शनिवारी दुपारी ४ वाजता पाटण्यात सर्व खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. केंद्रीय नेतृत्वाने बिहार राज्य पदाधिकाऱ्यांना बिहार सरकार स्थापनेचा फॉर्म्युला प्रस्तावित करण्याची घाई करू नये असे सांगितले आहे.

Web Title: Political movement in Bihar will speed up, Nitish Kumar will join BJP, 10 Congress MLAs will form a separate group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.